अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बनावट पास वापरून वाहतूक :- प्रशासन चे दुर्लक्ष

Google search engine
Google search engine

 

अमरावती

कोरोना सोबत लढण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले जात आहे.अमरावती शहरातील कोरोना आता जिल्ह्यातील ग्रामीण भागात शिरकाव केला आहे.मात्र याचे गांभीर्याने न घेता काही वाहन चालक हे स्वतः बरोबर इतरांचा सुद्दा जीव धोक्यात घालत आहे.किराणा आणि फळ वाहतूक साठी पास काढावी लागत आहे.मात्र काही जण डुप्लिकेट पास वापरून आपली वाहतूक संपूर्ण जिल्हा किंवा जिल्हा बाहेर करीत आहे.यावर निर्बंध कोन लावणार हा प्रश्न चर्चेत आहे.

तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात किराणा पोहचविले जात आहे मात्र काही ठिकाणी या वाहतूक मध्ये अवैध गुटखा ची सुद्दा तस्करी होते आहे.दोन दिवस आणि मोर्शी पोलिसांनी केलेल्या गुटखा हा चांदुर बाजार येथे येत होता अशी माहिती आहे तर परतवाडा येथून देखील चांदुर बाजार तालुक्यात गुटखा तस्करी साठी किराणा या अत्यावश्यक वाहनाचा उपयोग काही जण करत आहे.तर फळांच्या,वाहतूक साठी पास नसल्याने वाहतूक कोठे होते आहे याची देखील माहिती लपवली जात आहे.

बॉक्समध्ये
अत्यावश्यक सेवेच्या वाहतूक साठी वाहने संचारबंदी वगळ्यात यावे याबाबत चे पत्र आमदर देवेंद्र भुयार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले होते मात्र काही जण वाहतूक करताना जिल्हाधिकारी यांच्या कार्यलाय कडून आमदार देवेंद्र भुयार यांच्या सोबत झालेल्या पत्राच्या झेरॉक्स लावूनच जिल्हात किंवा जिल्हा बाहेर वाहतूक करीत आहे.मात्र त्या पत्र वर वाहतूक करणाऱ्या वाहनाचा कुठलीही माहिती नाही.

या बाबत प्रशासन यांच्या सोबत बोलणे करून ते रद्द करायला सांगतो.तसेच वाहतूक साठी पास काढावी.:- आमदार देवेंद्र भुयार
———————————————————-
अत्यावश्यक वाहतूक करताना तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांची वाहतुकीची परवानगी आवश्यक आहे.बोगस पास जर आढळून आली तर वाहनावर कार्यवाही करण्यात येईल. तरी सर्वानी पास काढूनच वाहतूक करावी आणि प्रशासन ला सहकार्य करावे.
ठाणेदार उदयसिग साळूके चांदुर बाजार.