||थेट शेतकरी ते ग्राहक जैविक टरबूज ची विक्री| ना नफा ना तोटा वर सुरू केली विक्री चांदुर बाजार:-

Google search engine
Google search engine

||थेट शेतकरी ते ग्राहक जैविक टरबूज ची विक्री|
ना नफा ना तोटा वर सुरू केली विक्री

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार तालुक्यातील माधान येथील शेतकरी गोकुल कोल्हे यांच्या ऍग्रो फ़ार्म वरील जैविक पध्दतीने पिकवलेले कलिंगड थेट शेतामध्ये विक्रीस त्यांनी उपलब्ध केले आहे.तर सोशल डिस्टिग बाबत देखील त्यांनी विशेष काळजी घेतली तर लोकडाऊन च्या काळात वेळेचे देखील बंधन त्यांनी पाळले.
कोल्हे यांनी त्यांच्या शेतामध्ये शुगर किंग व सुपर किंग या जातीचे वैशिष्ट्य पूर्ण, गोड, जास्त गर, टिकाऊ कलिंगड पिकवल आहे.तर त्यांनी त्यांच्या एक एकर मध्ये जवळपास कलींगड च्या लागवड ला 1 लाख रुपये इतका खर्च आल्याचे सांगितले.

लॉकडाऊन च्या काळा त कलिंगड विकाचे कसे हा प्रश्न निर्माण झाला होता मात्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांची विक्री सुरू केली.सकाळी 7 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 8 या दरम्यान याची विक्री सुरू असून प्रतिकिलो 8 रुपये या दराने ते याची विक्री करीत आहे. तर तालुक्यातील अनेक जण त्यांच्या शेतातील बांधावर जाऊन खरेदी करीत आहे.

त्यांनी शेताच्या गेट वरच कोरोना बचाव चे नियमावली लावली असून टरबूज विक्री करताना सॅनिटायझर सुद्दा त्यांनी योग्य अशी नियोजन केले आहे.तर या वर्षी नफा न कमवता याची विक्री करीत आहे.