अवैध वाळूची तस्करी करणाऱ्यांवर अधीक्षक यांच्या स्कॉड ची कार्यवाही ट्रॅकटर ट्रॉली सहित आरोपीला अटक चांदुर बाजार:-

अवैध वाळूची तस्करी करणाऱ्यांवर अधीक्षक यांच्या स्कॉड ची कार्यवाही
ट्रॅकटर ट्रॉली सहित आरोपीला अटक

चांदुर बाजार:-

संपूर्ण जग कोरोना सोबत लढत आहे मात्र वाळू घाटाचा लिलाव न झाल्याने अवैध वाळू तस्करी करणारे यांची देखील बरीच संख्या चांदुर बाजार तालुक्यात वाढली आहे.अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या स्कॉड ला मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे त्यांनी आसेगाव पोलीस स्टेशन हद्दीत मध्ये एक अवैध ट्रॅक्टर आणि आरोपिला ताब्यात घेतले.

पोलीस स्टेशन आसेगाव हद्दीतील ग्राम असदपुर येथील सापना नदी पात्रात अवैध रेती वाहतूक करताना एक ट्रॅक्टर क्रमांक mh 29 c 4901 ट्रॉली क्रमांक MH 27 AU 2030 अशा एकूण किंमत अंदाजे तीन लाख चार हजार रुपये माल आणि आरोपी
[ अब्दुल वकिल वल्द अब्दुल शफीक वय 24 रा असदपुर यास अटक करणयात आली.

ही कार्यवाही अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन यांच्या विशेष पथक चे इंचार्ज अजय आकरे,पंकज फाटे,स्वप्नील तवर, अजमद सैयद आणि आसेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस हेड कॉस्टबल नरेंद्र आघाडे यांनी केली.