स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना निवेदन आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे केले स्पस्ट अमरावती:-

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती यांना निवेदन

आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे केले स्पस्ट

अमरावती:-

कापूस उत्पादक पणन महासंघाने अचानक बंद केलेली शेतकऱ्यांची कापूस नोंदणी व खरेदी तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा याबाबत याचे निवेदन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी दिले.

अमरावती, भातकुली व तिवसा येथिल कापूस उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी व खरेदी पणन महासंघाने सुरू केली होती,त्यामध्ये जवळपास 4 हजार शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे,त्यापैकी 400 शेतकऱ्यांची कापूस केंद्रावर मोजणी झाली अन अचानक केंद्र बंद करण्यात आले, त्यामुळे 8 ते 10 हजार शेतकऱ्यांची नोंदणी अजून बाकी आहे.जर केंद्र सुरू झाले नाही तर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही,शेतकऱ्यांना येणाऱ्या खरीप हंगामात शेती कशी करायची हा बिकट प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहील,ज्या प्रमाणे आमदार,खासदार,मंत्री यांना निवडणूका आल्या की जसा शेतकरी आठवतो, त्या प्रमाणे या संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून प्रशासनाशी समन्वय साधून कापूस केंद्र सुरू करून संपूर्ण शेतकऱ्यांचा कापूस नोंदणी करून खरेदी करावा,ही विनंती
अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील देण्यात आला यावेळी
1.रवी पडोळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना अमरावती
2.प्रविण मोहोड जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी पक्ष अमरावती
3.मंगेश फाटे जिल्हाध्यक्ष युवा आघाडी अमरावती
4.नंदकिशोर शेरे स्वाभिमानी कार्यकर्ता उपस्थित होते.