मुंडगावातील वधू वराकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ११ हजार रुपये

0
670
Google search engine
Google search engine

मुंडगाव येथे पार पडला आदर्श विवाह

अकोटः ता.प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील मुंडगाव येथे सोशल डिस्टनसिंग चे पालन करीत अत्यंत साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला व वधू वराकडून ११००० रुपये राशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिले,संपूर्ण जगात कोरोना या महामारीने थैमान घातले आहे.त्यामुळे भारतात आपत्ती व्यवस्थापन कायदा व संचारबंदी लागू केली या संचारबंदी मध्ये लग्न समारंभ अत्यंत साध्या पद्धतीने व स्वतःच्या घरीच साजरा करण्याचे शाषणाचे आदेश आहेत.
त्यामुळे मयुरी सारंगधर चितोडे रा मुंडगाव व अमित गणेश बारहाते रा बाळापूर यांचा ०८ मे रोजी ठरलेला विवाह सोहळा संपन्न झाला व त्यांनी ११००० रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस जमा केले यावेळी सरपंच श्रावण भरक्षे,पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर दहीभात, उपसरपंच तुषार पाचकोर यांची उपस्थिती होती . तसेच मुंडगाव येथील दिलीप गवई यांचा मुलगा विशाल गवई व गाजीपुर येथील सुनील तायडे यांची मुलगी सपना तायडे यांचा सुध्दा आदर्श विवाह सोहळा पार पडला.