अपुरा दारुगोळा आणि जिगरबाज योद्धे आरोग्य विभाग आणि पोलिसांची जीवघेणी लढाई अमरावती:-

Google search engine
Google search engine

अपुरा दारुगोळा आणि जिगरबाज योद्धे
आरोग्य विभाग आणि पोलिसांची जीवघेणी लढाई

अमरावती:-

कोरोना महामारीचे लक्ष प्रामुख्याने पोलीस आणि आरोग्य कर्मचारी होताना दिसत असल्याचे चित्र आहे.तळागाळातील जनतेशी थेट संपर्क हा आरोग्य विभाग तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचा येत आहे.रुग्णालयात डॉक्टर,नर्स आणि आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष कोरोना बाधित रुग्णाला बरे करण्यासाठी धडपडत आहेत, तर पोलीस कर्मचारी दिवसरात्र कडा पहारा देत कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जीवतोड मेहनत करीत आहेत.परंतु यासाठी सुरक्षेच्या अपुऱ्या साधनसामग्री आणि कायम भीती मुळे या कर्मचाऱ्यांचे मानसिक संतुलन कायम राखणे गरजेचे आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात आशा सेविका, आरोग्य सेविका याना कोठलीही प्रशासनाकडून सुरक्षा विषयक किट पुरवली गेली नाही. याना कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यावर कसा कोरोना होणार नाही हा प्रश्न आता चर्चेचा विषय होत आहे.तालुक्यातील आरोग्य यंत्रणा मास्क सॅनिटायझर या प्राथमिक गरजेच्या वस्तू मिळवताना सुद्धा धावपळ होत असून हातमोजे आणि फेस शिल्ड याबाबी तर फार दूरच्या आहेत. पीपीई किट अत्यावश्यक आहेत परंतु ते मिळणे जवळपास दुरापास्त झाले आहेत.अशी चर्चा तळागाळातील कर्मचारी करत आहेत.

तालुक्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी आणि डॉक्टर यांना कोणत्याही मूलभूत सुरक्षेच्या सोयी सुविधा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत तरी जीवावर उदार होऊन दारोदार माहितीसाठी फिरत असून आरोग्य विभागाचे वरिष्ठ सरकारी बाबू खुर्चीत बसून आदेश झाडत असल्याची चर्चा आहे.रात्री अपरात्री आशा सेविका,परिचारिका तसेच डॉक्टर हे रुग्ण तपासणी साठी घराघरात जात असून बाधित रुग्णाची साखळी शोधताना दमछाक होत आहे.

चौकट
बधितांचे संपर्क शोधणे महाकठीण काम
संशयीत रुग्णांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आरोग्य विभाग व पोलीस कर्मचारी यांची धावपळ होत असून, नजीक संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची संपूर्ण माहिती प्रवास हिस्ट्री तसेच अजून कोणाच्या संपर्कात आलेत याबाबत सर्व माहिती ही तळागाळातील आरोग्य सेविकांना गोळा करावी लागते. परंतु यासाठी आशा कर्मचाऱ्यांना पुरेशा सुरक्षेची साधने उपलब्ध करणे गरजेचे आहे.