चांदुर बाजार येथे मद्यपान करणाऱ्यांची दुकान समोर रांग अधिक्षक यांनी केली स्वतः पाहणी

Google search engine
Google search engine

चांदुर बाजार येथे मद्यपान करणाऱ्यांची दुकान समोर रांग
अधिक्षक यांनी केली स्वतः पाहणी

चांदुर बाजार:-

दिड महिन्याचा कालावधी पासून बंद असलेलले वाइन शॉपी उघडण्याचा निर्णय हा राज्य सरकार ने घेतला आणि अनेकांचा आनंद हा गगनात न मावणार राहिला तर आज चांदुर बाजार येथील माईन वाईन शॉपी जवळ सकाळी 8 वाजल्यापासून रांग पाहायला मिळली.

सकाळी 10 ला दुकान उघड्या नंतर अनेकांनी एकच गर्दी केली तर कायदा आणि सुव्यवस्था साठी अचलपूर पोलीस उपविभागीय अधिकारी पोपट अबदगिरे तर राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रमुख अधीक्षक अमरावती राजेश कवळे यांनी या ठिकाणी भेट देऊन सूचना दिल्या.यावेळी चांदुर बाजार चे ठाणेदार उदयसिग साळूके,पोलीस उपनिरीक्षक गजानन रहाटे,पोलीस स्टेशन खुफिया वीरेंद्र अमृतकर, सुनील खंडारे,भूषण पेटे,निकेश नशीबकर,महेंद्र रोडे,यांनी सोशल डिस्टिंगबाबत आणि मास्क नसल्यावर कार्यवाही केली.

तर मास्क नसल्यावर कार्यवाही करण्यासाठी चांदुर बाजार नगर परिषद ची टीम देखील वाइन च्या दुकान समोर होती.