*दि 13 व 14 मे बुधवार व गुरुवारी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात जनता कर्फ्यु…* *नामदार बच्चूभाऊ कडू यांनी केल्या प्रशासनाला सूचना*

Google search engine
Google search engine

*दि 13 व 14 मे बुधवार व गुरुवारी अचलपूर व चांदूर बाजार तालुक्यात जनता कर्फ्यु…*

*नामदार बच्चूभाऊ कडू यांनी केल्या प्रशासनाला सूचना*

*अचलपूर विश्राम भवन येथे उपविभागीय अधिकारी व पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीमध्ये कोरोना विषाणू संदर्भात बैठक संपन्न*

अचलपूर दि 08/05

आजपासून येणारे पुढील 5 ते 7 दिवस अधिक दक्षता घेणे गरजेचे असल्याने येणाऱ्या 5 /7 दिवसात पोलिस प्रशासनासह सर्वांनी अधिक दक्ष राहन्याच्या सुचना ना.बच्चूभाऊ कडू यांनी उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना केल्यात.या दरम्यान
विशेषतः मुंबई ,पूणे व इतर राज्यातून येणाऱ्या लोकांपासून अत्यंत दक्षता घ्यावी लागणार असून त्यांना कोणत्याही परिस्थितीत अचलपुर , चांदूर बाजार व तालुक्यातील कोणत्याही गावांत थेट प्रवेश दिल्या जाऊ नये व जर कोणी आले असेल तर प्रत्येक गावांतील पोलीस पाटील ,सरपंच व गावकऱ्यांनी याबाबत वरीष्ठ स्थरावर ताबडतोब सुचना द्याव्यात .
तसेच , *दोन्ही तालुक्यातील नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे काम असल्या शिवाय अमरावती येथे जाऊ किंवा येऊ देऊ नये .याचे उल्लंघन करणाऱ्या वर गुन्हे दाखल करावेत* असे आदेश नामदार बच्चूभाऊ कडू यांनी दिलेत.
*येणाऱ्या 13 व 14 तारखेला बुधवार व गुरुवार ला अचलपूर व चांदूर बाजार दोन्ही तालुक्यात जनता कर्फ्यु पाळायचा असून फक्त जीवनाश्यक वस्तूचे दुकाने दवाखाने व मेडिकल वगळता सर्व दुकाने बंद ठेवून या जनता कर्फ्यु चे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे* अश्या सूचना याप्रसंगी नामदार बच्चूभाऊ कडू यांनी दिल्यात.