एकविरा स्कूल ऑफ ब्रिलियंट्स च्या सर्व मोर्शी, दर्यापूर, अमरावती शाखेसाठी ऑनलाइन शिक्षक कार्यशाळेचे आयोजन*

0
532
Google search engine
Google search engine

दर्यापूर :-

गेल्या 50 दिवसापासून विध्यार्थी यांचा शाळेसोबत च नात दुरावल्या मुळे त्यांना परत या शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याकरिता विशेष कृती आराखडा प्राचार्य श्री तुषार चव्हाण यांच्या द्वारे मोर्शी, दर्यापूर, अमरावती शाखेकरीता बनविण्यात आला ,या लॉक डाऊन च्या काळा मध्ये घरबसल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे कसे देण्यात येतील आणि त्याच्या वयाचा व मानसिकतेचा सुद्धा विचार करून त्यांना पुस्तकी व भौतिक ज्ञान कसे देण्यात येईल या अनुषंगाने कार्यशाळेत शैक्षणिक कौशल्य अभ्यासक्रम , विद्यार्थ्यांशी संवाद कसे करावे , शिक्षक व विद्यार्थी यांचे मध्ये ऑनलाईन संवाद व शिक्षण कसे मदत करु शकेलं व या सर्व विषयावर ऑनलाइन प्रणालीद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. मोर्शी, दर्यापूर, अमरावती शाखेच्या सर्व शिक्षकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदवला. कार्यशाळेची भूमिका प्राचार्य तुषार चव्हाण यांनी समजावून सांगितली व ऑनलाइन कार्यशाळेत तसेच शैक्षणिक संसाधने व विद्यार्थी शिक्षक यांना कसा फायदा होईल व आपले शैक्षणिक कौशल्य प्रभावी करून पुढील काळात या शैक्षणिक सुविधांचा वापर या लॉकडाऊन च्या काळात विद्यार्थ्यांसाठी कसा करता येईल यावर चर्चा करण्यात आली सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने नवे शैक्षणिक संसाधने व अभ्यासक्रम बनवून ते विद्यार्थ्यांना द्यावे असे आवाहन यावेळी करण्यात आले यासंदर्भातील विविध प्रश्न सहभागी शिक्षकांनी मांडली आणि त्याचे निरासरण सुद्धा करण्यात आले . भविष्यात असे उपक्रम किती महत्त्वाचे आहे यावर विचारविनिमय सुद्धा करण्यात आले व त्याबद्दल शाळेची भूमिका स्पष्ट करण्यात आली आॅनलाईन-टिचिंग चा उपयोग करने काळाची गरज आहे व त्याद्वारे ज्ञानाचा प्रचार व प्रसार होणे अगत्याचे आहे .लवकरच सर्व मोर्शी, दर्यापूर, अमरावती शाखेच्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असून , त्यां उपक्रमाचे कौतुक एकविरा शाळेचे विश्वस्त मंडळ करत आहे…