सुधीर इंगळे यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस महासंचालकांचे पदक जाहिर*

Google search engine
Google search engine

*

सांगली जिल्ह्यातील विटा ता.खानापूर येथील सुधीर अंकुश इंगळे यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह पदक जाहिर झाले आहे.
सुधीर इंगळे हे २००५ साली पोलीस दलात रुजू झाले असून त्यांनी आता पर्यंत १५ वर्ष सेवा बजावली आहे. ते महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ए टी एस) मध्ये नेमणूकीस असताना त्यांनी पुणे येथे झालेला जर्मन बेकरी बॉम्ब स्फोट, जंगली महाराज रोड साखळी बॉम्ब स्फोट तसेच मुंबई येथील दादर, झवेरी बाझार, ओपेरा हाऊस येथे झालेल्या साखळी बॉम्ब स्फोट या सारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याची दखल घेऊन राकेश मारिया यांच्यासारख्या धडाकेबाज अधिका-याने त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. पुणे येथे पकडण्यात आलेले नक्षलवाद्यांच्या अटकेमध्ये ते प्रामुख्याने आग्रेसर होते.
ते क्राईम ब्रांच येथे नेमणूकीस असताना पुणे येथील प्रसिद्ध रांका ज्वेलर्स मधील दीड कोटी रुपयांचे दागिन्यांची झालेली रॅबरी अवघ्या २४ तपासामध्ये उघडकीस आणली होती. तसेच चोरीस गेलेल्या सर्व दागिन्यांनसह आरोपींना अटक करण्यामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावली आहे. पुणे स्टेशन येथून अपहरण केलेल्या एक वर्षाच्या बालकाचा अथक परिश्रम घेऊन अवघ्या ३६ तपासामध्ये छडा लावला आहे. ते सध्या पुणे क्राईम ब्रांच येथे कार्यरत आहेत. त्यांनी दौंड येथे कमांडोचे प्रशिक्षण देखील यशस्वीरित्या पुर्ण केलेले आहे. त्यांना आतापर्यंतच्या सेवा कालावधीत १५० पेक्षा अधिक बक्षिस मिळालेली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेवून पोलीस महासंचालकांचे पदक जाहिर झाले आहे.