चांदुर बाजार तालुक्यातील ढगाच्या कळकळाट, सोसाट्याचा वारा सह जोरदार पाऊस संत्रा,कांदा ,केळी भाजीपाला चे सर्वाधिक नुकसान

चांदुर बाजार तालुक्यातील ढगाच्या कळकळाट, सोसाट्याचा वारा सह जोरदार पाऊस
संत्रा,कांदा ,केळी भाजीपाला चे सर्वाधिक नुकसान

चांदुर बाजार // .दिनांक 11मे 2020

शेतकरी हा नेहमी कधी नैसर्गिक किंवा मानव निर्मित आपत्ती मध्ये अडकला जात असतो.सध्या सगळे जग थांबले असताना शेतकरी मात्र हा त्याच्या शेतात राबराब काम करीत आहे.मात्र दिनांक 10 मे ला सायंकाळी 5.30 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शेतकरी याला पुन्हा आर्थिक संकट मध्ये उभे केले आहे.

तालुक्यातील शेतकरी यांचा गहू हे पीक काही शेतकरी यांचे घरी आले तर काहीच शेतात आहे.मात्र कांदा काढणी नुकतीच सुरू झाली होती.संत्रा ला आणि त्याच बरोबर केळी आणि भाजी पाला उत्पादन करणाऱ्या शेतकरी यांचे सर्वाधिक नुकसान झाले असून पावसा बरोबर बोर इतकी गारचा सुद्दा 5 मिनिट पर्यत पाऊस पडला.त्यामुळे आता शेतकरी वर्ग मध्ये चिंतेचे वातावरण आहे.

तालुक्यातील माधान, कोदोरी ,देऊरवाडा, काजळी,शिरजगाव कसबा,ब्राम्हणवाडा थडी,तर तालुक्यातील चारही महसूल मंडळ मध्ये जवळपास 1 तास पाऊस आणि गारपीट झाली आहे.तर पावसामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.बातमी लिही पर्यत प्रशासन कडून कुठल्याही नुकसान ची माहिती मिळाली नाही.

तर या झालेल्या नुकसान चे तात्काळ सर्वेक्षण करून त्याची मदत थेट शेतकरी यांच्या खात्यात जमा करावी.जेणे करून पेरणी करीत त्याला पुन्हा कर्जबाजारी व्हाव्हे लागणार नाही अशी प्रतिक्रिया प्रहार चे चांदुर बाजार अध्यक्ष संतोष कितुकले यांनी दिली.

फोटो :- गारपीट चे फोटो मेल केले आहे.