गारपीटग्रस्त भागाची जि .प. अध्यक्ष बबलू देशमुख देशमुखांनी केली पाहणी ■बोदड येथील बेघर झालेल्या कुटुंबाला केली आर्थिक मदत अमरावती / चांदुर बाजार

0
1275
Google search engine
Google search engine

गारपीटग्रस्त भागाची जि .प. अध्यक्ष बबलू देशमुख देशमुखांनी केली पाहणी
■बोदड येथील बेघर झालेल्या कुटुंबाला केली आर्थिक मदत

अमरावती / चांदुर बाजार

चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव ,शिरजगाव कसबा ,बहिरम, बोदळ ,सर्फापुर आदी गावातील परिसरात १० मे रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांचा पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची सर्वप्रथम जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शेत शिवारात जाऊन शेतकऱ्यांच्या आंबिया बहराची मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी करून तहसीलदाराना तात्काळ पंचनामे करण्याचे सांगितले आहे.
चांदुर बाजार तालुक्यातील करजगाव, शिरजगाव कसबा, घाटलाडकी ,कारंजा, बहिरम, देऊरवाडा ,सर्फ़ापुर ,वणी या परिसरात १० मे ला सायंकाळी साडे पाच वाजता अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या संत्रा आंबिया बहराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच कांदा, भाजीपाला आणि काही कुटुंबांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडून गेली आहेत. या वादळी वारा व गारांच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिसरातील बऱ्याच गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची जि प अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाहणी करून जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित केल्या जाईल असा शेतकऱ्यांना ना दिलासा दिला .तर येथील काही कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडून गेल्याने कुटुंब बेघर झाले असता त्या कुटुंबांना स्वतः आर्थिक मदत केली.
यावेळी शिरजगावकसबा ,करजगाव,ब्राह्मणवाडा, घाटलाडकी ,कारंजा ,सर्फ़ापूर, बहीरम, रतनपुर, सायखेडा, वणी येथील शेतकरी आप आपल्या शिवारात हजर होतेे .तसेच तालुका काँग्रेस तालुकाअध्यक्ष किशोर देशमुख , अचलपूर विधानसभा मतदार संघाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास सोनार ,अमर चौधरी ,किशोर ठाकरे अहमद चौधरी,प्रमोद घुलक्षे,रमेश घुलक्षे,तुषार धर्माळे, प्रमोद शेळके ,रामदास भोजने, रोशन भडांगे ,गुड्डू लाडोळे आदी शेतकरी शेत शिवारात उपस्थित होते.