राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने धडकले दोन दिवसात सर्वेक्षण करणायचे आदेश. राज्यमंत्री यांच्या नंतर तहसीलदार थेट शेतकरी यांच्या बांधावर

Google search engine
Google search engine

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने धडकले दोन दिवसात सर्वेक्षण करणायचे आदेश.
राज्यमंत्री यांच्या नंतर तहसीलदार थेट शेतकरी यांच्या बांधावर

अमरावती:-
दिनांक:- 11 मे 2020

दिनांक 10 मे ला सायंकाळी 5.30 च्या दरम्यान सुरू झालेल्या आणि लगातर एकसारख्या झालेल्या पावसासह,गारपीट,आणि सोसाट्याच्या वाऱ्याने शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले होते.त्यानंतर रात्री उशिरा पर्यत हलक्या सरी मध्ये पाऊस येत राहिला.यामध्ये संत्रा,केळी,10% गहू, कांदा ,पिपरी भाजीपाला चे सर्वाधिक नुकसान झाले होते.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सकाळी 7 लाच परिसराचा पाहणी दौरा सुरू केला आणि अमरावती जिल्हा धिकारी याना याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले.आणि सरसकट नुकसान भरपाई मिळणार असल्याचे राज्यमंत्री यांनी सांगितले .चांदुर बाजार चे नायब तहसीलदार अर्जुन वांदे हे राज्यमंत्री यांच्या नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांच्या सोबतच होते.

चौकट क्रमांक 1…….
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय कडून नुकसान भरपाई चे सर्वेक्षण चे आदेश प्राप्त होताच चांदुर बाजार चे तहसीलदार हे थेट शेतकरी यांच्या बांधावर पोहचले.

चौकट क्रमांक 2……..
या अवकाळी पावसामुळे सर्वधिक नुकसान हे संत्रा,कांदा, केळी चे झाले असून देऊरवादा येथील शेतकरी किरण सिनकर यांच्या शेततातील पिपरी चे सुद्दा मोठ्य प्रमाणात नुकसान झाले आहे.तर संत्रा च्या झाडावरील मृग नक्षत्र मधील फळांचा झाडाखाली ढीग पाहायला मिळाला.आणि कांदा चे पगर पाण्यामुळे घराब होण्याची शक्यता आहे.

चांदुर बाजार तालुक्यातील चांदुर बाजार महसूल मंडळ मध्ये सर्वाधिक 48.00 पावसाची नोंद करण्यात आली तर ब्राम्हणवाडा थडी 15.00, तळेगाव मोहना 36.00,बेलोरा 40.00,शिरजगाव 19.00 करजगाव 16.01 तसे आसेगाव 14.00 महसूल मंडळ मध्ये पावसाची नोंद करणयात आली.

प्रतिक्रिया:-
सरसकट सर्वांचे सर्वेक्षण होणार आहे.सर्व शेतकरी चे मोठे नुकसान झाले आहे.दोन दिवसात अहवाल वर पाठविले जाईल. जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून सर्वेक्षण चे आदेश काढले आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू महाराष्ट्र राज्य