काजळी देऊरवाडा येथे कांदा ,पिपरी आणि संत्रा चे अधिक नुकसान शेतकरी हवादील,आर्थिक परिस्थिती शी पुन्हा लढा

0
1132
Google search engine
Google search engine

काजळी देऊरवाडा येथे कांदा ,पिपरी आणि संत्रा चे अधिक नुकसान
शेतकरी हवादील,आर्थिक परिस्थिती शी पुन्हा लढा

चांदुर बाजार

शेतकरी यांनी गहू आपल्या घरात भरलाच होता आणि आता कांदा घरात भरणे सुरू होता तोच दिनांक 10 मे ला सायंकाळी पावसाने हजेरी लावून शेतकरी यांचा हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकला असून कोरोना सोबत लढत असताना अधिक कमी भाव हा शेत मालाला मिळत होता आणि या अवकाळी पावसामुळे शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे.

काजळी कोदोरी,माधान देऊरवादा या भागात अधिक जास्त प्रमाणात कांदा पीक घेतले जाते मात्र कांदा उपडून ठेवला आणि त्याचे पगर हे कापणार तोच पावसाच्या हजेरी ने आता ते घराब होणार हे मात्र नक्की तर देऊरवाडा येथील पिपरी उत्पादन करणारे शेतकरी किरण सिनकर यांचे देखील अवकाळी पावसामुळे अधिक नुकसान झाले आहे।.

संत्रा गार आणि सोसाट्याच्या वाऱ्या मुळे संत्रा च्या झाडावरील संत्रा देखील खाली गळून पडले असून भविष्यात येणारे देखील पीक हातून गेल्याने शेतकरी आता चांगलंच पेचात पडला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी ही आस शेतकरी याला लागली असून मुख्यमंत्री यांच्या निवडणूक मध्ये व्यस्त असताना हा तिढा लवकर सुटावा आणि शेतकरी याना आर्थिक पाठबळ मिळावी ही आस लागली आहे.