लोकमंगलतर्फे कोंडच्या आरोग्य विभागाचा सन्मान !

0
762

लोकमंगलतर्फे कोंडच्या आरोग्य विभागाचा सन्मान !

उस्मानाबाद/ प्रतिनीधी

सध्या देशासह महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू असलेल्या कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. या आजाराच्या सोबत स्वताचा जिव धोक्यात घालुन आरोग्य विभाग 24 तास सतत सेवा देत असल्यामुळे त्यांचा कोंड येथे परिचारिका दिनानिमित्त सत्कार करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग हा महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आरोग्य विभाग हा सतत सतर्क राहून उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी चांगलीच काळजी घेत आहे. त्यामुळे एक सामाजिक बांधिलकी म्हणून कोंड येथील संदीप पाटील यांनी पुढाकार घेऊन लोकमंगल को-ऑपरेटिव्ह मल्टीस्टेट शाखा कोंड यांच्यावतीने काल कोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मधील सर्व परिचारिका डॉक्टर , रुग्णवाहिका चालक सिद्दु वाघ व कर्मचाऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात केला यावेळी कोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किशन लोमटे व इतर त्यांचे सर्व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.या सत्कारानंर आरोग्य विभागातर्फे डाँ. किशन लोमटे यांनी केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले. यावेळी डॉ.किशन लोमटे, शाखाधिकारी पाटील संदीप, कॅशियर आरळकर अक्षय व सिद्धेश्वर वाघ उपस्थित होते. या हा सन्मान हा आरोग्य विभागाला उत्साह मिळावा व कोरोना सोबत लढण्यासाठी बळ मिळावे म्हणुन करण्यात आल्याचे संदीप पाटिल यांनी सांगीतले.