कोंडमधील डाँक्टरच्या निगराणीखाली १२८ जण काँरंटाईन !

0
1410

कोंडमधील डाँक्टरच्या निगराणीखाली १२८ जण काँरंटाईन !


हुकमत मुलाणी / उस्मानाबाद

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाने ३७ दिवसानंतर पुन्सा शिरकाव केल्यामुळे ग्रिन झोन मध्ये असलेला उस्मानाबाद जिल्हा पुन्हा आँरेज झोनमध्ये आला आहे.त्यामुळे उस्मानाबादकरांनी कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली आहे.नुकतेच जिल्ह्यात परंडा तालुक्यातील सरणवाडीत १ तर कळंब तालुक्यातील पाथर्डी या गावात १ व कळंब शहरात १ रुग्ण कोरोना बाधीत सापडले आहेत.प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणुन तात्काळ संबंधीतांची तपासणी करणे सुरु केले आहे.सुदैवाने आजपर्यत आलेले तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत असे असले तरी पुणे मुंबई येथुन उस्मानाबाद जिल्ह्यात येणार्या लोकांची संख्या काही केल्या थांबत नाही त्यामुळे प्रशासनाची मोठी धांदल उडत आहे.
याचाच एक भाग म्हणुन उस्मानाबाद तालुक्यातील कोंड हे गाव मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे या गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रा अंतर्गत ८ गावांचा कारभार पाहिला जातो या ८ गावची लोकसंख्या १८ हजार ६६० आहे. व सध्या बाहेर गावात गेलेल्या लोकांची परत येण्याची संख्या जवळपास १८०० आहे.दरम्यान ८ गावातील काँरंटाईन केलेल्या व्यक्तींची संख्या १२८ आहे.या सर्वाच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करण्यात आली आहे.या सर्वांची प्रक्रती ठणठणीत आहे. मात्र धोका आजुन टळलेला नाही १४ दिवस काँरंटाईन संपल्यावरच त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. परंतू महत्वाची बाब म्हणजे कोंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात फक्त एकच डाँक्टर आहेत त्यांच्या सोबत मोजकाच स्टाफ आहे. त्यामुळे एकाच डाँक्टरच्या खांद्यावर १९ हजार लोकांचा भार पडला आहे.
१८ हजार ६६० म्हणजे सध्या पुणे मुंबहुन आलेल्या व्यक्तीची संख्या जवळपास १८०० च्या जवळपास होती काही जणांना काँरंटाईन करुन घरी पाठवण्यात आले आहे. त्यापैकीच सध्या आज प्रशासनाकडे ८ गावामध्ये १२८ जणांना काँरंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीची नोंद करण्यात आलेली आहे.सध्या कोंड प्रथमिक आरौग्य केंद्रातील वैद्दकिय आधिकारी हे त्यांच्या कर्मचार्यांना घेऊन १२८ जणांवर निगराणी ठेवत आहेत.सध्या कोंड येथील दवाखान्या अंतर्गात येणार्या गावात एकच
डाँक्टर सोबत आरोग्य सेवीका ३ आहेत आरोग्य सेवक ३ आहेत. एक अँब्युंलस व ड्रायव्हर आहे तर मदतनीस १ आहे तसेच आरोग्य सहाय्याक फक्त १ सोबत समुदाय आरोग्य अधिकारी ३ देण्यात आले आहेत . आरणी येथे अर्धवेळ परिचर १ आहेत.म्हणजे सात गावाची निगराणी हे केवळ ऐकच डाँक्टर करत असल्याचे पहायला मिळत आहेत.सध्या परस्थीती जरी आटोक्यात असली तरी १९ हजार लोकांच्या मागे जर ऐकच डाँक्टर असतील तर परस्थीती गंभीर झाली तर आवघड होऊ शकते त्यामुळे कोंडससह परिसरातील लोकांनी व बाहेर गावाहुन आलेल्या लोकांनी तात्काळ प्रशासनाला माहिती द्यावी व विनाकारण बाहेर जाणे टाळावे व स्वाताची व कुटूंबाची काळजी घ्यावी असे आवाहन डाँ. किशन लोमटे यांनी केले आहे.