पालिकेच्या फवारणी पथकाद्वारा अविरत फवारणी

0
629
Google search engine
Google search engine

दोन पाळ्यांमध्ये करताहेत फवारणी

आकोटः संतोष विणके

आकोट नगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारा दोन फवारणी पथक गठित करण्यात आली आहेत. दोन पाळींमध्ये दोन्ही फवारणी पथकं शहराच्या विविध भागांमध्ये अविरत फवारणी करीत आहेत. या पथकाद्वारे वर्दळीचे व गर्दीची ठिकाणं सॕनिटाईज केल्या जात आहेत.

३ कर्मचाऱ्यांचे एक फवारणी पथक याप्रमाणे शहरात दोन फवारणी पथक कार्यान्वयीत करण्यात आली असुन पालिकेचे मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक चंदन चंडालिया हे या पथकांना दररोज फवारणीची ठिकाणं निर्देशित करून शहर कोरोना मुक्त ठेवण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

या फवारणी पथकाद्वारे आतापर्यंत विविध बँका, शासकीय-निमशासकीय कार्यालये, कोविड केअर सेंटर आयटीआय,दररोज भरणारा भाजी बाजार याठिकाणी फवारणी करण्यात येत आहे दरम्यान या पथकांची अविरत मेहनत पाहून या कोरोना वॉरीअर्सचा नांदुरा अर्बन बँक द्वारा सत्कार करण्यात आला.

मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या मार्गदर्शनाखाली या फवारणी पथकातील सचिन तेलगोटे,भरत मर्दाने, बादल हातेकर, जयंत चापके, राम सातपुते,शाबीर शहा सुलतान शहा हे पथकातील कर्मचारी अविरत परिश्रम घेत आहेत.