कोराना योद्धांना प्रतिकारशक्ती औषधीचे मोफत वाटप

0
771
Google search engine
Google search engine

 

अकोटच्या डॉ.नितिन हेंड यांचा उपक्रम

अकोटःसंतोष विणके

कोविड19 अर्थात कोरोना महामारी वर सध्या कोणतेही औषध उपलब्ध नसले तरी प्रतिकारशक्ती वाढवणारे होमिओपॅथिक औषध हे आयुष मंत्रालयाने मान्य केले आहे. या औषधीचे मोफत वितरण कोरोना योद्ध्यांना डॉ. हेड यांनी केले.

सध्या या उपक्रमामुळे कोरोनाशी लढणाऱ्या योद्धांचा या औषधीमुळे आत्मविश्‍वास वाढत आहे. कोरोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत असावी लागते आणि ती प्रतिकारशक्ती ही होमिओपॅथिक औषध घेतल्याने वाढते असे आयुष मंत्रालयाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये देण्यात आले आहे असा सल्ला डॉ. हेंड यांनी दिला आहे.

त्यांनी स्वखर्चाने हे औषध न.पा., आरोग्य,पोलीस,पत्रकार बँक व तहसिल कर्मचारी आदींना मोफत वितरीत केले.डॉ हेंड यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.