तळपत्या उन्हात सेवा देणाऱ्याप्रती आपुलकीपुर्ण संवेदना

0
743
Google search engine
Google search engine

कोरोना वॉरीअर्सना सन्मानित करुन साजरा केला वाढदिवस

कोरोना योद्धांना अल्पोपहाराचे वाटप

आकोटः संतोष विणके

शहरातील अक्षय जायले(पाटील) या निसर्गमित्र तरुणाने तळपत्या उन्हात सेवा देणाऱ्या कोरोना वॉरीअर्सना सन्मानित करुन वाढदिवस साजरा केला.

त्याने सेवाभावी वृत्तीचा पुन्हा परिचय देत कोविड-19 या महामारीशी लढण्याऱ्या कोरोना योध्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. कोरोना योध्यांना कर्तव्यस्थानावरच अल्पोपहार वाटप करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त केला.

उन्हाचा पारा ४५ डिग्री च्या तापमानात पोहचाला असतांनाही दिवस रात्र झटत असलेले तथा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सतत आपले कर्तव्य बजावणारे पालिकेचे सफाई कर्मचारी, आरोग्य सेवे मधील डॉक्टर नर्सेस कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी, पोलीस,आशा अशा विविध क्षेत्रात या सतत सेवा बजावणार्‍या कोरोना या योध्यांना या सन्मानामुळे नव्याने प्रेरणा मिळाली असुन आपल्या सेवाकार्याची दखलघेणार्‍यांप्रती आभार व्यक्त करून अक्षय आर्शिवाद देऊन भावी आयुष्यासाठी सुयश चिंतले आहे.

निसर्गमित्र अक्षय जायले (पाटील) हा युवा कार्यकर्ता विविध सामाजिक कामे करत असून त्याला खूप वर्षा पासून झाडे लावण्याचा त्याला छंद आहे.अक्षय च्या छंदा मुळे त्याने हजारो झाडे लावलीतच नाहीत तर जगवली सुद्धा महत्वाचे की तो फक्त झाडे लावत नसून तो त्यांना पाणी देण्याचे पण दायित्व तो घेत असतो हे विषेश !!