कोरोनाचे दिवस संपणार कधी? बालचमूना पडला प्रश्न? कु.मृणाल देशमुख

8
सांगली/ कडेगाव

कोरोनाच्या युद्धामुळे सर्वजण त्रासलेले असून घरटयात राहून त्रस्त बनले आहेत. गेली ५० दिवसाच्या काळात सर्वजण घरात राहूनच घरातच कुटुंबासोबत काम करीत आहेत. घरच्याना बंदी काळात सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे बालचमूची , बालचमूने घरातील सर्वांनाच त्राही त्राही करून सोडले आहे. नको ते प्रश्न विचारुन भडावून सोडले आहे. कोरोना कुठे आहे? दिसत का नाही? मास्क तोंडाला का घालयचा ? असे अनेक प्रश्न विचारुन पालकाची उतरे देताना भंबेरी उडाली आहे. पण काही बालचमू आपल्या घरातल्याना आपल्या अंगातील कलागुण दाखवत असतात. काही बालचमू शाळेत जाता येत नसल्याने नाराज होवून शाळा कधी चालू होईल याकडे लक्ष ठेवून आहेत. अशावेळी, काही बालके मात्र आपला वेगळा ठसा उमटवत आहेत.

कोरोनाच्या युद्धामुळे शाळा सुरु होणार नाही याची खंत कराड येथील सरस्वती विधामंदीरमध्ये शिकत असलेली कु मृणाल हिराजी देशमुख हिने मांडली आहे. “हे दिवस संपणार कधी” या कवितेत म्हणते की

वाचताना कळलेच नाही नकळत,
डोळ्यातून अश्रू ओघळले कधी?
तुझ्या आठवणीने मनाला सतत ,
खुणावणारी, ओढ तुझी संपणार कधी? आईसम शिक्षकासमवेत तुझ्या भेटीच्या
आतुरतेचा अंत होणार कधी?
कोरोनावरती विजय मिळवून
आम्ही सारे पुन्हा बागडणार कधी? शाळाई तुझ्या एवढीच मनात दाटलेली
उत्सुकता संपणार कधी?
या सुंदर काव्यातीलआनंदी प्रसंग
पुन्हा प्रत्यक्षात घडणार कधी?
तुझ्या आठवणीने व्याकुळ झालेले हे दिवस
संपणार तरी कधी?
खात्री आहे की तुझ्या सोबतीने अनुभवलेले
क्षण विसरणार नाहीत कधी

शाळाई एवढच सांग मला की या प्रश्नाना
उतर मिळणार कसे आणि कधी?

असा प्रश्न पडला असून कधी शाळा सुरु होणार तुझ्या आठवणी घेवूनच माझ्या सारखे बालचमू तुझ्या अंगणात कधी येणार हे ठाऊक नाही हे संकट लवकर जावून आम्हाला आनंदाचा वर्षाव साजरा करता येईल आम्हा बालचमूना खेळता बागडता येईल तो दिवस आम्हा बालचमूच्या दृष्टीने भाग्याचा तोपर्यत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.