कडेगावात कोरोनायुद्ध रोखण्यासाठी होमिओपॅथ डॉ. दिपक शिंदे यांचे योगदान

Google search engine
Google search engine

सांगली/ कडेगाव

कोरोनाचे धमासान युद्ध सुरु आहे. सर्व जग कोरोनाव्हायरसच्या त्रासातून जात असताना अजूनही यावर लस किंवा ठोस उपाय उपलब्ध नसल्याने जनतेमध्ये संभ्रम तयार होणे साहजिक आहे. मुख्यत्वे कोरोनाव्हायरस, सध्या सुरु असलेला लॉकडाऊन, आणि भविष्याविषयी अनिश्चितता यामुळे नागरिकांमध्ये प्रकट दिसत असलेली भीती दूर करणे हे आरोग्य शिक्षण व्यवस्थेसमोरचे मोठे आवाहन आहे.
संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतातील ग्राम आरोग्य अध्याय १४ मधील ओवी क्रमांक १३ मध्ये म्हटले आहे की       

त्याने रोग प्रचार झाला।       
लागट रोग वाढतच गेला ।    
बळी घेतले हजारो लोकाला।
वाढोनि साथ।।    
खरोखरच कोरोनाने सर्वांच्या गळयाला मिठी मारतो काय, या भीतीने लोक गांगरुन गेले आहेत. त्यांना होमिओपॅथीक औषधाद्धारे दिलासा देण्याचे काम कडेगाव येथील डॉ. दिपक शिंदे त्यांच्या ‘नेहा होमिओ क्लिनिक’ द्वारे करत आहेत.  आयुष मंत्रालयाने निर्देशित केलेलं ‘अर्सेनिक आल्ब’ हे कोरोना प्रतिबंधसंबंधी उपयुक्त असणारे औषध अगदी पहिल्या दिवसापासून डॉ. शिंदे यांनी सर्वाना मोफत उपलब्ध करून दिले. सर्व प्रकारच्या रुग्णांना तसेच नागरीकांना मानसिक क्षमता व धैर्य वाढवण्याच्या दृष्टीने आरोग्य शिक्षण व सल्ला मोफत दिला आहे.  

कोरोनाव्हायरस संबंधी परिस्थीतिला तोंड देताना होमिओपॅथीक आरोग्य दृष्टीकोन महत्वाचा असल्याचे सांगत डॉ. शिंदे यांनी नागरीकांना मानसिक क्षमता मजबूत करण्यासाठी आवश्यक बाबीचे मार्गदर्शन मोफत उपलब्ध करून दिले आहे. नागरिक मोठ्या संख्येने याचा फायदा घेत आहे. ग्रामीण भागात होमिओपॅथीचा प्रसार व सर्वागीण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘नेहा होमिओ क्लिनिक’ ने सुरवातीला सोहोली सारख्या खेड्यात सेवा दिली व नंतर सर्वांच्या सोयीच्या दृष्टीने कडेगाव या तालुक्याच्या ठिकाणी क्लिनिक थाटले आहे.

कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी अर्सेनिक आल्ब हे औषध मोफत उपलब्ध करून दिल्याने कडेगाव तसेच पलूस व कराड तालुक्यात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी याचा उपयोग करून घेतला. डॉ. शिंदे यांनी जास्तीतजास्त लोकांपर्यंत औषध पोचवले जावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय राजकीय प्रतिनिधींनासुद्धा या प्रक्रियेत सामील करून घेतले.

‘नेहा होमिओ क्लिनिक’ मार्फत मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले होमिओपॅथिक औषध ३५०० पेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचले आहे. फक्त औषध न देता डॉ. शिंदे यांनी स्वतःला नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्यासाठी फोन व क्लिनिकद्वारे वेळ उपलब्ध करून दिला आहे. सोबतच नागरिकांची माहितीची गरज समोर आल्यानंतर दोन पानी माहितीपत्रक सुद्धा दिले जात आहे. कोरोना व्हायरस च्या संसर्ग भीतीने व्यापलेल्या वातावरणात घाबरलेल्या नागरिकांना समुपदेशनाची सुविधा सुद्धा उपलब्ध करून दिली जात आहे. अजूनही नागरिक या सुविधेचा फायदा घेऊन कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी शारीरिकच नव्हे तर मानसिक धैर्य सुद्धा वाढवत आहेत. डॉ. दिपक शिंदे यांच्या  कोरोना युद्धाला रोखण्यासाठीच्या सेवाभावी कार्याला सलाम!