कोरोना- लातूर 6 पाँझीटिव्ह ,बिड 2 पाँझीटिव्ह तर उस्मानाबादचे 2 जणांची होणार पुन्हा तपासणी !

0
647



लातूर जिल्हयातील एकुण 23 स्वॅबपैकी 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह व 17व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह


बीड जिल्ह्यातील 77 स्वॅबपैकी 73 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह तर 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह

उस्मानाबाद जिल्हयातील 18 स्वॅबपैकी 16 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह तर 2 व्यक्तींच्या स्वॅबची पुनर्तपासणी होणार

उस्मानाबाद / प्रतिनीधी

लातूर, दि. 18:- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक 18.05.2020 रोजी एकुण 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 9 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 3 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी असुन त्यापैकी सर्वच 3 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, निलंगा येथुन 8 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून 2 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत, चाकुर येथुन 2, अहमदपुर येथुन एका व्यक्तींचा स्वॅब तपासणीसाठी आला होता त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. लातुर जिल्हयातील असे एकुण 23 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह असुन 17व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तसेच बीड जिल्हयातील 77 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 73 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहेत व 2 व्यक्तींचे अहवाल (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हयातील 18 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी16व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे (Inconclusive) आले असल्यामुळे त्यांची पुनर्तपासणी करण्यात येणार आहे. असे एकुण आज 118 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले असुन 04 व्यक्तींचे अहवाल Inconclusive आले असून 106 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत आहेत अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.