शेतकऱ्यांना थेट बांधावर खते, कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यात हयगय नको — आमदार देवेंद्र भुयार

0
1456
Google search engine
Google search engine

आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना बांधावर खते बियाणे उपलब्ध ! 

 

वरुड तालुका प्रतिनिधी /
संचारबंदी काळात कृषि विभागाच्या वतीने आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पोहच करण्यात येत आहे. या योजनेचा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतकरी गटांच्या माध्यमातून फायदा मिळाला आहे.
शेतक-यांच्या बांधावर खते बियाणे थेट पुरवठा उपक्रम महाराष्ट्र शासन कृषि विभाग अंतर्गत सन-२०२०- २१ शेतक-यांच्या बांधावर खते, बियाणे थेट पुरवठा उपक्रम अंतर्गत मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांचे उपस्थितीत अन्नपुर्णा किसान उत्पादक संघ,जरूड या गटाला जरूड येथे एस.एस.पी, एम.ओ.पी., डी.ऐ.पी, १०:२६ : २६ असे एकुण ७ मे.टन व पिंपळखुटा या गावाला एस.एस.पी, एम. ओ. पी, डी.ऐ.पी, १० :२६:२६ असे एकुण ७ मे.टन खते गटातील शेतक-यांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला .
सदर कार्यक्रमा अंतर्गत जय भवानी शेतकरी गट,लोणी या गटाला आमदार देवेंद्र भुयार यांचे हस्ते तुर (चारु) बियाणे एकुण २८ किलो चा थेट पुरवठा शेतक-यांच्या बांधावर करण्यात आला. तसेच वरूड तालुक्यातील सर्व शेतक-यांना गटामार्फत खते बियाणे खरेदी करण्याचे आवाहन केले , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असल्याने शेतरकऱ्यांनी कृषि सेवा केंद्रावर जाऊन निविष्ठा खरेदी करताना संचारबंदी नियमावलीचे पालन न केल्यास कोरोना साथीचा फैलाव होण्याचा धोका होता. हा धोका टाळण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी कृषी विभागाला सूचना देऊन शेतकऱ्यांना आवश्यक खते थेट बांधावर पोहच करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला . त्या निर्णयाप्रमाणे वरुड तालुक्यातील सर्व शेतकरी गट व शेतकऱ्यांना या योजनेतर्गंत बांधावर खत उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांचे गटतयार करण्यात आले. शेतकऱ्यांना या गटांच्या माध्यमातून आपल्याला आवश्यक असणारी खते व बियाणे यांची मागणी सबंधीत गटप्रमुखाकडे शेतकऱ्यांनी नोंदवल्यानंतर तो गटप्रमुख कृषि सेवा केंद्रामधून खतांची खरेदी करीत असल्याने कृषि सेवा केंद्रामध्ये होणारी गर्दी देखील यामुळे कमी होईल. यावर थेट कृषि विभागाचे नियंत्रण असल्याने जास्त दराने होणारी खत विक्री थांबली गेली पाहिजे . तसेच शेतकऱ्यांना देखील गुणवत्तापूर्ण व विश्वासार्ह खते मिळणे सुलभ झाले पाहिजे कृषि विभागाने बियाणे उपलब्धतेबाबत व त्याच्या गुणवत्तेबाबत अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे. शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे थेट बांधावर खते, कृषि तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत हयगय करु नका अश्या सूचना आमदार देवेंद्र भुयार यांनी कृषी विभागाला दिल्या .
आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर निविष्ठा खरेदीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी संबंधित गावातील विक्रेता, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक वकृषि अधिकारी यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्या सुचना आमदार देवेंद्र भुयार यांनी दिल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. तसेच खरीपाच्या पेरण्या सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक खतांचा पुरवठा होणार आहे. यावेळी सदर कार्यक्रमाला आमदार देवेंद्र भुयार, सुधाकर मानकर सरपंच,ग्रामपंचायत जरूड, शैलेश ठाकरे उपसरपंच, सोपान ढोले अध्यक्ष,तंटामुक्ती,जरूड, प्रशांत काळबेंडे,प्रगतीशील शेतकरी ,  राहुल पडोळे,अध्यक्ष, अन्नपुर्णा किसान उत्पादक संघ , राजेश होले, .प्रमोद सोनारे यु.आर.आगरकर,तालुका कृषिअधिकारी, राजू सावळे, कृषि अधिकारी, पं. स.वरूड, संतोष सातदिवे, मंडळ कृषि अधिकारी,बेनोडा, लक्ष्मीकांत श्रीराव, विनोद बोंडे, कृषि सहायक, यांच्यासह शेतकरी गटातील सर्व सदस्य उपस्थीत होते.