स्वाभिमानीच्या उपक्रमाला शेतकऱ्यांची साथ

0
420

स्वाभिमानीच्या उपक्रमाला शेतकऱ्यांची साथ

शेगाव :- कोरोना महामारीत सगळे जग घरात बसले असतांना जगाला अन्नपुरवठा करण्याचे काम शेतकरी एखाद्या फूड वॉरीयार सारखा आहे.
सगळी व्यवस्था कोलमडून पळली असतांना यात अनेक शेतकरी कोरोना ग्रस्त झाले आहेत त्यांना कोरोनाची लागण झाली आहे तरी जगाच्या पोशिंद्याने हे काम थांबविले नाही. सरकारने २० लाख कोटी चे पॅकेज जाहीर केले तर त्यात शेतकऱ्यांना व मजुरांच्या तोंडाला पाने पुसली असा आरोपही माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर केला आहे तर त्यांनी या उपक्रमाची हाक शेतकऱ्यांना केली व शेतकऱ्यांच्या कार्याला प्रोत्साहन मिळावे व आपल्या मागण्यांसाठी देशभरासह शेगाव शहारामध्ये १६ मे रोजी अनोखा उपक्रम राबविण्यात आला. अखिल भारतीय किसान संघर्ष समिती व माजी खाजदार राजू शेट्टी यांनी आव्हान केल्या प्रमाणे सकाळी ०९ वाजता शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगणात किंवा शेतात, शेती अवजारे व देशाचा तिरंगातसेच आणि संघटनेचा झेंडा घेऊन गर्व से काहो हम किसान है, अन्नदाता योद्धा है, उनका सन्मान कारना चाहिये अशा घोषणा दिल्या गेल्या. स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे व अनेक शेतकऱ्यांनी आपल्या घरूनच या निमित्याने शेतकऱ्यांचा सन्मान केला.