उस्मानाबादचे शेतकरी कोरोनाच्या संकटात – माजी जि.प. सदस्य बाळासाहेब गुरव

0
1332

उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी कोरोना आजाराच्या महामारीने मोठा संकटात आला आहे. शेतकऱ्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह संपूर्ण शेतीवर आधारित आहे परंतु या कोरोना आजारामुळे गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी संकटात आला आहे. शेतातील पिकांचे फळांचे मोठ्या प्रमाणात जागेवर सडून नुकसान झाले आहे. यात केळीच्या भागा द्राक्षबागा ,आंबा , कलिंगड , फळभाजा आदींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. फळभाज्या तर जागेवर सडून गेल्या तर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मोफत केळीच्या बागांचे वाटप केले सदर शेतकऱ्याकडे सडलेला माल बाहेर फेकण्याचे सुद्धा धाडस राहिलेले नाही. याबाबत कोंड येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब उर्फ चंद्रकांत गुरव यांनी विदर्भ न्युजशी बोलताना सांगीतले की शेतकर्‍यांना शासनाकडून झालेल्या नुकसानीचे भरपाई मिळाली तरच शेतकरी जगू शकतो सध्या शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. असे मत व्यक्त केले आहे. तसेच सध्या शेतकर्याना पेरणीसाठी शेतीची मशागत , नांगरणी ,मोगडणी , पेरणी करण्यासाठी अर्थीक मदत करणे गरजेचे आहे.गेल्या दहा वर्षापासून कोंड परिसरासह उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी कंगाल झाल्यामुळे सध्या तर या कोरोना आजाराने आता तर शेतकरी हवालदिल झाला आसल्याची प्रतिक्रीया बाळासाहेब ऊर्फ चंद्रकांत गुरव यांनी दिली.