कडेगाव नगरपंचायत मुख्याधिकारी यांचा भोंगळ कारभार ची चौकशी व्हावी या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. नगरपंचायतीचे विरोधी पक्षनेते उदयसिंह देशमुख

दलित वस्तीतील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे काम अपूर्ण असून विहीर पूर्ण होऊ नये यासाठी काँग्रेसच्या एका पुढाऱ्यांनी आपली ताकद पणाला लावली आहे .या दबावतंत्र मुळेच मुख्याधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे .असा आरोप नगरपंचायतीचे भाजपचे विरोधी पक्षनेते उदयसिंह देशमुख यांनी केला आहे .याबाबतचे निवेदन सांगली जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना पाठवण्यात आले आहे. यादी निवेदनात म्हटले आहे की ,दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सण 2018 -2019 मध्ये डीपीडीसी मधून विहीर मंजूर झाली आहे. त्या विहिरी साठी बौद्ध समाजाने स्वतःच्या मालकीची सुमारे दोन गुंठे जमीन दिली आहे. त्यानंतर नगरपंचायतीने विहिरीच्या जागेच्या कागदपत्रांची पूर्तता केली व लगेच नगरपंचायत टेंडर काढले होते. टेंडर मंजूर होऊन विहिरीचे काम सुरू झाले. लॉक डाऊन च्या काळात विहीर खुदाई चे काम पूर्णपणे ठप्प झाले. याच विहिरी लगत एका काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची विहीर असल्याने मुद्दाम दलित विहिरीचे काम पूर्ण होऊ नये .यासाठी कडेगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी यांच्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी दबावतंत्राचा वापर करून विहिरीचे काम थांबले आहे .सध्या ओढ्याला टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी सुटल्यामुळे त्या विहिरीत पाणी शिरले आहे.
व काम बंद असल्यामुळे पाणी खराब झाले आहे. याचाच गैरफायदा घेऊन मुद्दाम काम थांबवण्यासाठी मुख्याधिकारी यांनी काम चालू असलेल्या विहिरीमधील पाणी तपासणी साठी पाठवले आहे.

गतवेळी कडेगाव नगरपंचायतीची स्वच्छते चे टेंडर चोवीस लाख रुपये होते तर यावर्षी हेच टेंडर 74 लाखाचे कशे झाले हे टेंडर ही ही शंकास्पद आहे. या मुख्याधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी विनंती सांगली जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे कडेगाव नगरपंचायतीचे भाजपाचे विरोधी पक्ष नेते उदयसिंह देशमुख यांनी केली आहे. या निवेदनावर अनंत मिसाळ,नितिन दोडके,किरण मिसाळ,महेन्द्र बनसोडे,सचिन दोडके,शिवाजी माळी,रामचन्द्र गोवींद माळी इत्यादीच्या सह्याआहेत.