उस्मानाबादेत ई-पाससाठी हुज्जत घालण्याचे प्रमाण वाढले !

519
जाहिरात

उस्मानाबादेत ई-पाससाठी हुज्जत घालण्याचे प्रमाण वाढले !


उस्मानाबाद / प्रतिनीधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा घेणाऱ्या लोकांसाठी उस्मानाबादचा ई – पास विभाग वरदानच ठरत आहे परंतु स्वतःच्या व नातेवाईकाच्या हट्टा पाई काही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती विनाकारण उस्मानाबाद येथील ई- पास विभागात येऊन अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालत असल्यामुळे अधिकाऱ्यावर चांगला ताण वाढल्याचे दिसत आहे. उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांनी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोणाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून चांगलेच प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ई-पास विभाग सुरू करण्यात आला आहे. हा विभाग जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार राजकुमार माने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात सुद्धा कोरोणाचा चांगलाच फैलाव दिवसेंदिवस होत असल्याचे दिसत आहे. रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचाच एक सतर्क भाग म्हणून उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील ई-पास विभागातुन फक्त अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय कारणासाठी, शासकीय कारणासाठी व फक्त अत्यावश्यक सेवेसाठी हे पास देण्यात येत असल्याची माहिती माने यांनी दिली. परंतु काही सुशिक्षीत लोक अशिक्षीतपणाचा आव आणुन अत्यावशाक सेवा वगळता स्वतःच्या व नातेवाईकांच्या हट्टासाठी कार्यालयात येऊन अधीकार्यासोबत विनाकारण हुज्जत घालत असल्याचे प्रकार होत असल्याचीही चर्चा सुरू आहे ह्या अशा लोकांमुळे अधिकार्‍यांना त्यांना समजावून सांगण्यात जास्त वेळ जात आहे. अत्यावश्यक सेवा आरोग्य सेवा व प्रशासकीय कामासाठी जाणारे अधिकारी यांना फक्त ई- पास देण्याचे सध्या काम सुरू आहे. उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार राजकुमार माने हे त्यांचे सात ते आठ कर्मचारी घेऊन स्वतः सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील आँनलाइन ई-पास विभागात सतर्कतेने काम करत आहेत. परंतु हे विनाकारण वाद घालणारे लोक येत असल्यामुळे त्यांच्या वरील व कर्मचाऱ्यांवरील ताण विनाकारणच वाढला आहे. परंतु अशा गोष्टीकडे लक्ष न देता हे अधिकारी कर्मचारी हे आलेल्या अर्जावर बारीक निरीक्षण करून जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या आदेशाचे पालन करत असल्याचे दिसत आहे. ऑनलाईन केलेल्या अर्जामधील कसून चौकशी करतात तसेच अर्ज मध्ये आपुरी माहिती असेल तर तो अर्ज रद्द केला जातो. अत्यावश्यक सेवेतील नियमाची पूर्ण पुर्तता केलेल्या अर्जाला तात्काळ खात्री करुन हा विभाग मंजूरी देतो. त्यामुळे गरज नसताना जे लोक अर्ज करतात त्यांचा अर्ज हा बाद केला जातो. आणि बाद झालेल्या अर्जाच्या शिफारशी घेऊन काही लोक जिल्हाधिकारी कार्यालयात येतात व विनाकारण अधिकाऱ्यांसोबत हुज्जत घालतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसून काम करणे मुश्कील झाले आहे. उस्मानाबाद जिल्हा सध्या ऑरेंज मध्ये असल्यामुळे तो ग्रीन झोन मध्ये कसा येईल यासाठी प्रशासन सतत प्रयत्न करत आहे. परंतु हे इतर लोक विनाकारण त्रास देऊन खोटेनाटे बहाणे करून मुंबई पुणे औरंगाबाद इतर ठिकाणी ये- जा करण्यासाठी पासची मागणी करत आहेत. तरीही तहसीलदार माने हे अशा लोकांना न जुमानता आपल्या कर्मचाऱ्यांना सतर्क वार्निंग देऊन अत्यावश्यक सेवा आरोग्य सेवा शासकीय अधिकारी कामानिमित्त जाणारे यांनी केलेल्या अर्जाची खात्री करूनच त्यांना पास देऊन हा विभाग सतर्क राहत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात येण्यासाठी कोणालाही अडवले जात नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन नये म्हणून उस्मानाबाद येथून रेडझोनमध्ये जाण्यासाठी फक्त वैद्दकिय सेवा , अत्यावश्यक सेवा , शासकिय कामासाठी शासकिय कर्मचारी यानाच फक्त पास देण्याचे आदेश असल्यामुळे त्यांनाच पास देऊन इतर सर्व पास रद्द करण्यात येत आहेत तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातून मुंबई महा नगरपालीका ठाणे महा नगरपालीका ,कल्याण डोंबीवली महा नगरपालीका व मुंबई महा नगर प्राधीकरण मधील इतर सर्व महा नगर पालीका , पुणे महा नगरपालीका ,पिंपरी चिंचवड मसनगरपालीका , पुणे महानगर प्राधीकरण त्याचबरोबर , सोलापूर औरंगाबाद मालेगाव नाशिक धुळे जळगाव आकोला आमरावती या महानगरपालीका अंतर्गत येणारा सर्व भाग हा शासनाने रेडझोन व कंटेनमेंट झोन घोषित केल्यामुळे या भागात नागरीकांना प्रवेशबंदी केली आहे.त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना कोव्हीड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी व कोरोणाचा रेडझोन व कंटेनमेंट झोनमधून जिल्ह्यात होणारा शिरकाव टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातून वरील ठिकाणी जाण्यासाठी बदी घालण्यात आली आहे त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील अपवाद आति तातडीची वैद्दकिय सेवा व इतर अत्यावशक सेवा वगळता इतर सेवेसाठी नागरीकांनी अर्ज करु नये.तसेच जर दुसर्या जिल्ह्यातुन उस्मानाबाद जिल्ह्यात वाहनाने यायचे असेल तर सदर वाहन हे उस्मानाबाद जिल्ह्यातून पाठवले जाणार नाही.जिल्ह्यात प्रवेश केल्या नंतर त्या वाहनासह ड्रायव्हर व प्रवासी यांना १४ दिवस काँरंटाईन होणे बंधनकारक आहे.
.व उस्मानाबाद जिल्ह्यातून रेड झोनमध्ये जाण्यसाठी परवानगी नाकारली जाते . कोंड येथील एका कँन्सर पिडित रुग्णाला पास ची गरज होती तर त्या रुग्णाला घेऊन जाणारी गाडी उस्मानाबाद सिमेवरील पोलीसांनी रोखली होती दरम्यान एका माध्यम प्रतिनीधीनी तहसीलदार राजकुमार माने यांच्याशी संपर्क साधुन तात्काळ दहा मिनीटात ई- पास उपलब्द करुन दिला त्यामुळे त्या रुग्णासाठी हा विभाग जिवादानच ठरला. तसेच तेर येथील एक कँन्सरने आजारी असलेल्या महिलेला केमोसाठी बार्शी येथे जाण्यासाठी परवानगीसाठी आँनलाइन अर्ज केला होता त्याना माने यांनी रात्री आकरा वाजता परवानगी दिली त्यामुळे त्यानाही संजीवनी मिळाली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरीकांनी विनाकारण ,अपुर्ण माहिती भरुन , योग्य कारण नसलेले , अर्ज करु नये तसेच एकदा रद्द केलेले अर्ज परत करु न विनाकारण प्रशासनाचा वेळ वाया घालवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।