राजमुद्रा प्रतिष्ठानचा निराधारांना आधार

381
जाहिरात

आकोटः संतोष विणके

लॉकडाऊनच्या पहील्या दिवसापासून अविरत अन्नदान

आतापर्यंत भाजी पोळी शिरा पुरीसह मसाला भात व खिचडीचे गरीबांना घरपोच वितरण

लॉकडाऊनमुळे अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.या फटक्यामुळं अनेक निराधार गोरगरीबांना दोन वेळच्या अन्नपाण्याची व्यवस्था करणेही कठीण होऊन बसले असतांना अश्या गरजु लोकांना अकोट शहरातील राजमुद्रा प्रतिष्ठान लॉकडाऊनच्या पहील्या दिवसापासुन निस्वार्थभावाने अन्नदान करत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने सलग ५६ दिवसापासुन अविरत अन्नदान सेवा सुरू आहे

.गरीब निराधार गरजु लोकांना घरपोच जेवणाचे पाकिटे पोचविण्यात येत आहे. लॉकडाउन वाढले तरीही अन्नदान असेच सुरू ठेवण्याचा प्रतिष्ठाच्या तरुणांचा संकल्प आहे.प्रतिष्ठानचे तरुण कार्येकर्ते गरीबांच्या सेवेसाठी दिवसरात्र राबत आहेत.तरुण उर्जेची ही अखंड सेवा बघता या कार्यकर्त्यांना अनेकांनी मदतीसाठी पुढे येत माणुसकीची ही सेवा निरंतर सुरु ठेवण्यास बळ दिले आहे.

राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित असणाऱ्या या तरुणांना काही सेवाभावी मित्रांनी अखंड सेवेसाठी मदत केली आहे. या उपक्रमासाठी कोणीही मदत करु इच्छित असल्यास ईच्छुकांनी शशांक कासवे. ८६०५५०५०७७ यांच्याशी संपर्क साधावा.

या उपक्रमात शशांक कासवे,कैलास धुळे,शुभम देशपांडे, तेजस लेंघे, आशिष गवई,अमित दुबे,अजय शर्मा,गणेश कुकडे,आकाश गवई,अक्षय गावंडे,शुभम मुरकुटे, पियुष बाळापुरे, किरण इंगळे,बंटी सपकाळ,अमित चव्हाण,अमित काळे,संतोष भावे,धनराज गावंडे, सागर काकड,रोशन थारकर यांच्या सर्वांचे तन मनाने परिश्रम घेत आहेत.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।