घरकुलाबद्दल विचारणा केली असता सचिवाने फेकल्या याद्या व कागदपत्रे – राजना ग्रामपंचायत मधील धक्कादायक प्रकार

857
जाहिरात

अनुसूचित जातीच्या लोकांना घरकुल योजनेपासून ठेवले वंचित

बीडीओ व ठाणेदार यांच्याकडे तक्रार

चांदूर रेल्वे – (ता. प्र.)

चांदूर रेल्वे तालुक्यातील राजना येथील ग्रामपंचायत सचिवाने अनुसूचित जातीच्या लोकांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवले असुन घरकुलाबाबत विचारणा केली असता लाभार्थ्यांसमोरच सचिवाने याद्या व कागदपत्रे फेकत धुमाकुळ घातल्याचा धक्कादायक बुधवारी ग्रामपंचायतमध्ये घडला. सदर प्रकार हा कॅमेरात कैद सुध्दा झाला आहे. लाभार्थ्यांनी याबाबत गटविकास अधिकारी व ठाणेदार यांच्याकडे तक्रारी दिल्या आहे.

राजना येथील ग्रामपंचायत सचिव यांचा अनेक दिवसांपासुन गलथान कारभार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे. अशातच बुधवारी राजना गावातील अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी २०१७ पासुन रमाबाई आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर का केले जात नाही असा जाब ग्रामपंचायत मध्ये जाऊन सचिवांना विचारला असता सचिवाने उध्दटपणे वागणूक देऊन कलम १४४ अंतर्गत गुन्हा दाखल करू असे म्हटल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे. तसेच कागदपत्रे व याद्या फेकफाक केल्या. सचिवांच्या रूद्रअवतारामुळे ग्रामपंचायतमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे सदर सचिवावर कारवाईची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. यावेळी लाभार्थ्यांची उपस्थिती होती. वरिष्ठ अधिकारी या सचिवावर कारवाईचा बडगा उगारणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

 

घरकुलापासुन ठेवले वंचित

रमाई घरकुल आवास योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित ठेवले आहे. याबाबत विचारणा करायला सचिव यांच्याकडे गेलो असता त्यांनी १४४ कलम अंतर्गत रिपोर्ट देऊ असे म्हटले. तसेच लाभार्थ्यांना उद्धट वागणूक दिली. याबाबतची तक्रार केली असून आम्हाला न्याय मिळावा ही अपेक्षा आहे.

– संजय गोसावी

 

कागदपत्रे आमच्या अंगावर फेकली

आम्ही ग्रामपंचायत मध्ये गेलो व सचिवाला घरकुलाबाबत माहिती विचारली. मात्र त्यांनी उडवाउडवीचे उत्तर देऊन कागदपत्रे आमच्या अंगावर फेकून दिली. तसेच कलम १४४ ची धमकी दिली.

– राहुल गोसावी

 

चांगल्या भाषेत समजावून सांगितले

घरकुल मंजूर करणे ग्रामपंचायत स्तरावर नाही आणि एकाला एकच वेळा घरकुलाचा लाभ मिळू शकतो. मी ग्रामपंचायत मध्ये रूजू होण्याअगोदरच यादी तयार झाली होती. तसेच घरकुलाचे टार्गेट वरिष्ठांकडून मिळाले ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. लाभार्थी ग्रामपंचायत कार्यालयात आले असता मी त्यांना चांगल्या भाषेत समजावून सांगून तोंडाला काहीतरी बांधा व दुरून बोलण्यास सांगितले. व बाहेर येता येता कागदपत्रांना माझा धक्का लागला.
– मनिष इंगोले, सचिव

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।