आदिवासी  कुटुंबांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते धान्य वाटप ! 

0
1262
Google search engine
Google search engine

आदिवासी  कुटुंबांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते धान्य वाटप ! 

 वरुड मोर्शी तालुक्यातील ७०२ आदिवासी कुटुंबांना दिलासा !

 वरुड तालुका प्रतिनिधी :
        सद्यस्थितीत राज्यात तसेच राष्ट्रीय पातळीवर कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्यात फौजदारी संहिता 1973 चे कलम 144 लागू केले असल्याने राज्यात जमावबंदी तसेच संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. त्यामुळे मोलमजुरी करणारे, आदिवासी जनतेचा उत्पन्नाचा स्रोत हिरावला गेला आहे. उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कालावधीत रोजगार बंद असल्याने अनेकांना पोटाची खळगी भरणे अवघड झाले आहे. असे गरीब आदिवासी कुटुंब ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांना धान्याची प्रतीक्षा करावी लागत असून त्यांना तात्काळ धान्य मिळावे यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, यांच्याकडे मागणी केली होती .
    अमरावती जिल्ह्यातील इतर गावांमध्ये ज्या आदिवासी बांधवांकडे रेशन कार्ड नाही  अश्या आदिवासी कुटुंबियांना शासनाकडून मोफत धान्य मिळावे यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी शासनाकडे मागणी केली होती आहे.  ज्या आदिवासी कुटुंबाकडे रेशन कार्डच नाही अशी आदिवासी कुटुंब धान्याच्या प्रतीक्षेत असतांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या प्रयत्नामुळे त्यांना आदिवासी विकास महामंडळाच्या या एकाधिकार योजनेअंतर्गत धान्य उपलब्ध झाले आहे.
    मोर्शी तालुक्यातील ३७४ कुटुंबांना व वरुड तालुक्यातील ३२८  आदिवासी कुटुंबांकडे रेशन कार्डच नाही अशा मोर्शी वरुड तालुक्यातील  ७०२ आदिवासी  कुटुंबांना धान्य मिळण्यासाठी त्यांची यादी शासनाकडे पाठवण्यात आली होती. आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची शासनाने दखल घेऊन मोर्शी वरुड तालुक्यायील ७०२ आदिवासी कुटुंबांना आदिवासी विकास महामंडळाच्या या एकाधिकार योजनेअंतर्गत मोफत धान्य उपलब्ध करून दिल्यामुळे आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला आहे वरुड तालुक्यात ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अश्या आदिवासी बांधवांना आमदार देवेंद्र भुयार यांच्या उपस्थितीत आदिवासी विकास महामंडळाच्या या एकाधिकार योजने अंतर्गत मोफत धान्य वाटप करण्यात आले त्यावेळी तहसीलदार सुनील सावंत , राजेंद्र बहुरूपी जी प सदस्य , बाळू पाटील कोहळे , बाबाराव बहुरुपी , प्रभाकर काळे , राहुल चौधरी , निखिल बनसोड , प्रणव कडू  गोपाल भाकरे , विलास उघडे , सतीश पाटणकर यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती .