अमरावती कोविड रूग्णालयातून सात जणांना डिस्चार्ज – थोड्याच वेळात आणखी चौघांना मिळणार सुट्टी

3594
जाहिरात

 

अमरावती, दि. 22 : जिल्हा कोविड रूग्णालयातून काल सायंकाळपासून सातजणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात पाच महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे.

यात मसानगंज येथील 35 वर्षीय महिला, खोलापुरी गेट येथील 35 वर्षीय महिला, मसान गंज येथील 38 वर्षीय महिला, मसानगंज येथील 52 वर्षीय महिला, मसानगंज येथील 45 वर्षीय पुरुष, नांदगाव पेठ येथील 60 वर्षीय महिला, परतवाडा येथील 42 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्या रूग्णांची संख्या 72 झाली आहे.

कोरोना योग्य उपचारांनी बरा होतो. त्यामुळे कुठलीही लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून घ्यावी. समाजहित जपण्यासाठी माहिती स्वत:हून देऊन तपासणी करून खातरजमा केली पाहिजे. उपचार घेतले पाहिजेत, असे आवाहन या रूग्णांनी केले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह कोविड रूग्णालयातील स्टाफकडून सर्वांचे अभिनंदन करून निरोप देण्यात आला. घरी परतल्यानंतर हे रूग्ण 14 दिवस विलगीकरणात राहणार आहेत.

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।