आकोटात लालपरीला थंड प्रतिसाद… तेल्हारा बसला प्रवाशीही नाही मिळाला

524
जाहिरात

आकोटः संतोष विणके

जवळपास दोन महीन्यांच्या कालावधीनंतर लालपरी काल शुक्रवारी रस्त्यावर धावली.मात्र लालपरीला आकोटमध्ये पहील्या दिवशी अतिशय थंड प्रतिसाद मिळाला.सकाळी आकोट- तेल्हारा बसच्या पहील्या फेरीला तर प्रवाशीही नाही मिळाला.आकोट आगारातुन काल आकोट गांधीग्राम ,आकोट-निंबा,अकोट- तेल्हारा साठी बसेस सोडण्यात आल्या.मात्र या मार्गावरची बससेवा ही ग्रामिण भागातली असल्याने प्रवाश्यांचा फार काही प्रतिसाद मिळाला नाही.याबाबत आगार प्रशासनाने दिलेल्या माहीतीनुसार या मार्गांवर एकुण १६ फेऱ्या सोडण्यात आल्या.मात्र यातील अनेक बसेसला प्रवाश्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.एकंदरीतच या अत्यल्प प्रतिसादामुळं प्रवाश्यांच्या मनात कोरोनाची भिती असल्याचं दिसुन येत असल्याची चर्चा सामान्य जनांमध्ये ऐकावयास येत होती.

हजेरी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांची धाव

जवळपास गेल्या दोन महीन्यापासुन एस.टी.चे चाकं थांबलेली होती.आज लालपरी सेवत रुजु होताच अनेक कर्मचारींनी ड्युटी मिळवण्यासाठी धडपड सुरु होती.जे कर्मचारी कामावर असतील त्यांचाच दैनंदिन पगार मिळणार असल्याची चर्चा असल्याने अनेकांनी ड्युटी मिळावी म्हणुन प्रयत्न केलेत. कोरोना च्या सुरुवातीला अनेक बस चालक वाहकांनी जिवाची पर्वा न करता सेवा दिली मात्र लॉक डाउन नंतरच्या पगाराच्या साशंकतेमुळं काहींनी नाराजी व्यक्त केली.त्यामुळं एसटी कर्मचाऱ्यांची उपासमार न व्हावी अशी मागणी होत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।