ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांचा वाढदिवसानिमित्त नारळ व आंबा वृक्ष भेट देवून सत्कार करण्यात आला.

Google search engine
Google search engine


कडेपूर ग्रामपंचायतमध्ये मा.जि. प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख(भाऊ) यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार : आंबा व नारळाचे झाड भेट : सोशलडिस्टन्सिंगचे पालन

सांगली/कडेगांव

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त कडेपूर (ता.कडेगाव) येथील ग्रामपंचायतमध्ये सत्कार करण्यात आला. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेवून सोशलडिस्टन्सिंगचे पालन करत ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब यादव यांच्याहस्ते आंबा व नारळाचे झाड देवून हा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा मजूर सहकारी संस्था फेडरेशनचे नेते सतीशराव देशमुख, डोंगराई सूतगिरणीचे अध्यक्ष जयदीप देशमुख, हर्ष पॉलीमर्स कंपनीचे चेअरमन नेताजी यादव, सरपंच रूपाली यादव, उपसरपंच संग्राम यादव, माजी सरपंच पंजाबराव यादव, संपतराव देशमुख सोसायटीचे उपाध्यक्ष सागर यादव, ग्रामपंचायत सदस्य लालासाहेब यादव, अमर यादव, पांडुरंग वाघमारे, कृष्णत घाडगे, बादशहा मुलाणी, अरूणा यादव, मंदाकिनी यादव, सीमा यादव, रत्नमाला यादव, सीमा चव्हाण, सुवर्णा काशिद, पुष्पा करकटे, सतीश यादव, ग्रामविकास अधिकारी अनिल जमदाडे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.