आकोटामध्ये उसळतेय रस्त्यावर गर्दी.. 

675
जाहिरात

अकोटः संतोष विणके

प्रशासनासह नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज

एकीकडे अकोला महानगरात कडकडीत संचारबंदीचे आदेश असताना अकोट उपविभागाला नॉन रेडझोन असल्याने दिलासा मिळाला आहे. मात्र जीवनावश्यक वस्तूसह ईतर खरेदीसाठी आकोटात सकाळी १२ वाजेपर्यंत रस्त्यांवर गर्दी उसळत आहे. या गर्दीने सोशल डिस्टनिंगचे वाभाडे निघत असून प्रशासनाने कठोर होण्याची गरज आहे. सुदैवाने अकोट उपविभाग हा अजून सेफ असल्याने ही परिस्थिती कायम राखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी सतर्क राहून रस्त्यांवर उसळणाऱ्या अवास्तव गर्दीला आवर घालणे अत्यावश्यक झाले आहे.

सुरुवातीला जीवनावश्यक गरजेसाठी १२ वाजेपर्यंत परवानगी असल्यावरही फार गर्दी नसायची आता मात्र रस्त्यांवर वाढणारी गर्दी ही आतापर्यंतच्या मेहनतीला नख लावणार  नाही याची खबरदारी घेणे अत्यावश्यक झाले आहे. बाजारातील अवास्तव गर्दी, टुविलर गाड्यांचा सुळसुळाट, बघितल्यावर प्रशासनाच्या मेहनतीवर पाणी तर फिरणार नाही..? अशी चर्चा सामान्य जनांमध्ये आहे.

नागरिकांनी सूचना व नियम पाळण्याची गरज

तालुका सेफ रहावा म्हणुन प्रशासनासह शासकीय यंत्रणा अतोनात मेहनत घेत आहे मात्र नागरिकांनी अवास्तव कामाशिवाय अत्यावश्यक गरजेसाठीच घराबाहेर पडणे गरजेचे आहे अन्यथा आतापर्यंत सेफ असलेला अकोट उपविभाग हा अडचणीत जाऊ शकतो

नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांनुसार तोंडावर मास्क लावणे सुरक्षित अंतर पाळणे वारंवार हात धुणे परिसर स्वच्छता ठेवणे अवास्तव गर्दी टाळणे आदी नियमांचे पालन प्राधान्याने करणे गरजेचे झाले आहे.नाहीतर तालुक्याच्या आरोग्याचे केव्हाही १२ वाजु शकतात.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।