युवक कॉंग्रेसद्वारा आकोटात गरजुंना मदत वितरण

98

आकोटः संतोष विणके

सध्या कोरोनाच्या संकटामध्ये संपूर्ण देश होरपळून गेला आहे. या संकटकाळात गरीबांना मदत म्हणुन दि.२१ मे.रोजी मा.पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत महाराष्ट्र युवक काँग्रेस च्या वतीने अध्यक्ष. सत्यजित दादा तांबे आणि अकोला लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष. महेश सुधाकरराव गणगणे यांच्या नेतृत्वात गरीबांना रोख मदत वितरणाचा अनुभव न्याय उपक्रम राबवण्यात आला.

यामध्ये अकोट मधील गरजू लोकांना 200 रुपये देऊन अनुभव न्याय कर्यक्रमाच्या माध्यमातून मदत करण्यात आली.यावेळी उपस्थित अकोला जिल्हा युवक काँग्रेस महासचिव मयूर किशोर निमकर,नंदू टेमझरे, अर्पित बोरोडे, हर्षल बहादुरे,दीपेश सावरकर याच्या हस्ते मदत राशी वितरीत करण्यात आली. उपक्रमाचे आयोजन अकोट शहर युवक काँग्रेस यांच्या वतीने करण्यात आले होते.या उपक्रमाअंतर्गत नंदीपेठ परीसरासरातील २० गरीब गरजुंना मदत वितरीत करण्यात आली.