*मोर्शी मध्ये आलेल्या टोळधाडीवर प्रभावी उपाययोजना तातडीने करणे गरजेचे* *झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. – माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे* *प्रतिनिधी ;-*

0
1121
Google search engine
Google search engine

*मोर्शी मध्ये आलेल्या टोळधाडीवर प्रभावी उपाययोजना तातडीने करणे गरजेचे*

*झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. – माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे*

*प्रतिनिधी ;-*

मोर्शी तालुक्यातील पाळा, भिवकुंडी, भाईपुर, हिवरखेड शिवारातील संत्रा झाडे, संत्रा बहार, मका, पनेरी ह्याच्यावर टोळधाड आली असून पान फस्त करून ही टोळधाड मोठे नुकसान करीत आहे, या टोळधडीवर अग्निशमन यंत्राने फवारणी करून प्रभावी उपाययोजना करावी अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.
कोरोनाच्या संकटासोबतच मोर्शी तालुक्यावर टोळधाडीचे नवीन संकट आले आहे. पाळा येथील सोनू राणे, प्रश्नात राणे, रुपेश राणे, अजय गूळधे, किशोर गावंडे, शेंदूरकर, प्रकाश ढोके, ओंकार साठे, भाईपुर येथील विवेक राऊत, अनिल शिंदे, वायकुळ गुरुजी यांचे शेतातील संत्रा झाडे व मका चे पूर्ण पाने फस्त करून मोठे नुकसान केले आहे. 3 किलोमीटरच्या आडव्या पट्याने करोड्याच्या संख्येने ही टोळधाड पुढे सरकत आहे. या टोळधाडीने अंडे टाकल्याने अधिक जास्त प्रमाणात नुकसान होते.
मध्यप्रदेश शासनाने अग्निशमन यंत्राने संपूर्ण परिसराची फवारणी करून या टोळधाडीवर नियंत्रण मिळविले. त्याचप्रमाणें कृषी व महसूल विभागाने तातडीने दखल घेऊन मोर्शी पाळा, भाईपुर, हिवरखेड परिसरात अग्निशमन यंत्राने फवारणी व इतर प्रभावी उपाययोजना कराव्यात.तसेच नुकसान झालेल्या शेताचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.