जुन्या वैमान्यश मधून 60 वर्षीय पुरुषावर जीवघेणा हल्ला तर आरोपिच शोध सुरू देऊरवाडा येथील घटना

0
1553
Google search engine
Google search engine

जुन्या वैमान्यश मधून 60 वर्षीय पुरुषावर जीवघेणा हल्ला
तर आरोपिच शोध सुरू देऊरवाडा येथील घटना

चांदुर बाजार:-

अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील देऊरवाडा (काजळी)या गावात आज सकाळी दिनांक 25 ला सकाळी रमजान ईद असल्यामुळे प्रार्थना साठी इदगा या ठिकाणी गेलेल्या हासम शेख अजीम वय 60 वर्ष रा.देऊरवाडा यांच्या जीवघेणा हल्ला करन्यात आला.या मध्ये गंभीर जखमी झालेल्या पुरुषांना चांदुर बाजार ग्रामीण रुग्णालयात आणि तिथून अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार साठी पाठवण्यात आले.

जखमी पुरुष आणि ज्यांनी हल्ला केला यांचे जुने काही वाद असल्याची चर्चा गावात आहे.तर अनेक वेळा त्यांचे एकमेकासोबत वाद झाले आहे.त्याचा राग म्हणत धरून हल्ला केली असल्याची प्राथमिक माहिती पोलीस सूत्रा कडून मिळाली आहे.यामध्ये पोलीस यांनी घटना स्थळी पोहचून परिस्थिती चा आढावा घेतला आणि आरोपीचा शोध सुरू केला आहे.तर जखमी वर अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उपचार सुरू आहे.

प्रतिक्रिया:-
देऊरवाडा येथील घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोहचून जखमी याना उपचार साठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले असून लवकरच आरोपी याना अटक करू. तसेच पुढील तपास वरिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.तसेच गावात शांतता आहे.

गोपाल उपाध्यय
ठाणेदार शिरजगाव कसबा