चांदुर बाजार तालुक्यातील हिरुळपूर्णा या ठिकाणी दोन कोरोना पॉझिटिव्ह गावासह तालुक्यातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

0
1060
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार तालुक्यातील हिरुळपूर्णा या ठिकाणी दोन कोरोना पॉझिटिव्ह
गावासह तालुक्यातील ग्रामीण भागात भीतीचे वातावरण

चांदुर बाजार:-शशिकांत निचत

चांदुर बाजार वरून आसेगाव रोडवर असलेल्या हिरुळपूर्णा या गावातील क्वारंटाइन असलेल्या 23 वर्षीय महिला आणि तिच्या मुलाचा स्वब चा रिपोर्ट आज दिनांक 25 ला आलेल्या 6 रिपोर्ट मध्ये पॉझिटिव्ह आला असल्याने गावसह तालुक्यातील चर्चा वाऱ्यासारखी पसरली.तर ही महिला मुबंई या ठिकाण वरून आली असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहिती वरून हिरुळपूर्णा या गावात 4 लोकांना क्वारंटाइन करण्यात आले होते.यामध्ये शुक्रवारी दिनांक 21 ला या दोघाचे रिपोर्ट घेण्यात आले होते.त्यानंतर त्यांना गावातील शाळेतच क्वारंटाइन करण्यात आलेल्या इतर दोघे जण आणि महिला च्या संपर्कात आलेल्या स्वब चे तपासणी केली जाणार आहे .तर हिरुळपूर्णा गावाला लागून असलेल्या खेड्यात देखील प्रशासन अलर्ट वर आहे.

आज सकाळी माहिती मिळताच अचलपूर उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी गाव सील करण्याचे आदेश दिले.चांदुर बाजार चे तहसीलदार अभिजित जगताप ,मंडळ अधिकारी गजानन दातेआणि पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ प्रफुल्ल बोरखडे,सहायक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे ,सहायक पोलीस निरीक्षक तेजस्विनी गिरसावडे यांनी ठिकाणी पाहणी केली .तसेच सर्वानी काळजी घेण्याची आव्हान केले आहे.

चौकट …..क्रमांक 1
तर ही महिला 17 मे ला मुबंई वरुन खाजगी वाहनाने आली असल्याची माहिती आहे.तर तिच्या पती हा पोलीस विभागात कार्यरत असून त्यांचा देखील स्वब चा अहवाल हा मुबंई या ठिकाणी पॉझिटिव्ह आला होता.क्वारंटाइन असलेल्या हा 23 वर्षीय महिला आणि 3 वर्षीय मुलगी ही रात्रीला आपल्या नातेवाईक कडे झोपायला जात असल्याची माहिती आहे.मात्र गावकरी यांच्या कडून याला दुजोरा देण्यात आला नाही.तसेच जेवणाचा डबा नेणारे देखील संपर्कात आले असल्याची चर्चा असून गावातील अनेक लोकांच्या संपर्कात त्या महिलेचे इतर नातेवाईक आली असल्याची चर्चा आहे.

चौकट क्रमांक…..2
अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाला चांदुर बाजार तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत मध्ये या गंभीर परिस्थिती मध्ये सुद्दा दखल घेतली गेली नाही आणि गाव बंदी मोहीम फक्त नावालाच राहिली आहे.त्यामुळे ग्रामीण भागात या कोरोना विषाणू बाबत प्रशासन बरोबर नागरिकांनी सुद्दा सतर्क राहणे महत्वाचे आहे.

चौकट क्रमांक 3
चार गाव कटम झोन तर एक बफर झोन मध्ये …….

  • हिरुळपूर्णा या गावात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हिरुळपूर्ण ,सर्फबाद, शहापूर ,तुळजापूर गडी हे गाव कंटम झोन म्हणून घोषित करणयात आले तर एक किलोमीटर असलेले कोटगावंडी हे गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली असल्याचे माहिती प्रशासन कडून मिळाली.