शेगांवातून कोरोनावर मात करणारा पहिला रुग्ण !

836

शेगांव:-  बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील कोरोना रुग्णांची चैन तुटली असताना, अचानक पणे शेगाव नगरपरिषदेचा ३५ वर्षीय सफाई कामगार हा कोरोना बाधित आढळल्याने डॉक्टर्स आणि प्रशासनाची चिंता वाढली होती परंतु आज दिनांक २५ मे रोजी हा सफाई कामगार कोरोना मुक्त होऊन घरी परतत आहे, याकरता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी शेगाव येथील सईबाई मोटे सामान्य रुग्णालयात येऊन दवाखान्यातील नर्स, डॉक्टर, मेडिकल ऑफिसर, सफाई कामगार या सर्वांचे फुल आणि पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं, यावेळी या सफाई कामगाराची पत्नीसुद्धाजी या आजाराने बाधीत आहे ती रुग्णालयाच्या खिडकीतून त्याला हात दाखवून आनंद व्यक्त करीत होती आपल्या शुभेच्छा देताना दिसली यावेळी आता नोवेल कोरोना या आजाराचा संपूर्ण इलाज शेगावच्या सईबाई मोटे या रुग्णालयात होईल असं डॉक्टर प्रेमचंद पंडित यांनी आमच्याशी बोलताना सांगितले, ६० दिवसाच्या लॉकडावुन मध्ये शासनाची ही खूप मोठी उपलब्धता आहे कि, या आजाराचा संपूर्ण उपचार तालुक्याच्या रुग्णालयांमध्ये सर्व सुविधा पुरवून डॉक्टरांना संरक्षित करून या आजारावर जागीच उपचार करता येईल, आम्ही आपल्या लोकप्रिय सिटी न्युज सुपरफास्ट च्या माध्यमातून वाचकांना व नागरिकांना ही विनंती करू कि, त्यांनी न घाबरता, न भिता स्वतःहून जर का आपण बाहेर गावाहून किंवा एखादा कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले असाल्याचे लक्षण दिसत असता तर आपली तपासणी जवळच्या रुग्णालयात त्वरित करून घ्यावी आणि घरात रहा सुरक्षित रहा शासणांच्या नियमांच पालन करा.

दिलेला उपचाराला आणि औषधांचा लाभ या रुग्णाला होऊन हा रुग्ण बरा झाला, शेगावसाठी हा क्षण अभिमानाचा असून सर्वत्र आनंद पाहायला मिळतो आहे.
– डॉ. प्रेमचंद पंडित, (जिल्हा शल्यचिकित्सक)

जाहिरात