आज होणार हिरुळपूर्णा येथील १३ व्यक्तीची होणार स्वबची तपासणी; राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आढावा प्रशासन सतर्क तर शहरात कोरोना मुक्त चे चित्र ? चांदूर बाजार -शशिकांत निचत

आज होणार हिरुळपूर्णा येथील १३ व्यक्तीची होणार स्वबची तपासणी; राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आढावा
प्रशासन सतर्क तर शहरात कोरोना मुक्त चे चित्र ?

चांदूर बाजार -शशिकांत निचत

तालुक्यातील हिरुळपूर्ण येथे मुंबई वरून परतलेले माय व लेकाला कोरोना चा अहवाल पोजेटीव्ह आल्यानंतर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ९ व्यक्तींना अमरावती येथे हलवण्यात आले आहे. तसेच चार व्यक्तींना चांदूर बाजार येथील क्वारेन्टीन सेंटर येथे ठेवण्यात आले आहे. तर या सर्व व्यक्तीचे ट्रोथ स्क्रॅब बुधवारी दिनांक 27 ला घेण्यात येणार आहे.
महिलेची व मुलाच्या संपर्कातील व्यक्तीची चौकशी केली असता एकूण १३ व्यक्ती संपर्कात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार यामधील हाय रिस्क असलेले ९ व्यक्तींना अमरावती येथे हलविण्यात आले आहे. तर ४ जणांना चांदुर बाजार येथील क्वारेटाईन सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. या सर्व १३ व्यक्ती चे बुधवारी ट्रोथ स्क्रॅब घेण्यात येणार आहे.
यावेळी हिरुळपूर्ण येथिल परिसर पूर्णतः निर्जंतुकिकरणाची फवारणी करन्यात आला आहे. गावात तहसीलदार अभिजीत जगताप, सहायक पोलिस निरीक्षक पंकज दाभाडे, तेजस्विनी गिरसावले तळ ठोकून बसले होते. तर उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी हिरूळपूर्ण गावाचा ३ किलोमीटर परिसर कंटेन्मेंट झोन तर पाच किलोमीटर चा भाग बफर झोन घोषित केले आहे. तसेच ग्रामीण भागातील कवरेन्टीन सेंटर वर २४ तास कर्मचारीची ड्युटी लावण्या संबधी सूचना देण्यात आल्या आहे.
मुंबई सारख्या रेड झोन मधून परतलेल्या या माता-पुत्र मुळे तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर परिसरातील तीन गावे सील करण्यात आली आहे. नागरिकांनी घाबरू नये मात्र सतर्क राहावे. असे आव्हान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले.व विनाकारण बाहेर फिरणाऱ्या कार्यवाही तसेच ग्रामीण भागात काळजी घेण्याच्या सूचना सुद्दा त्यांनी तहसीलदार अभिजीत जगताप,गटविकास अधिकारी डॉ प्रफुल्ल बोरखडे,ठाणेदार उदयसिग साळूके,याना दिल्या. यावेळी पंचायत समिती सदस्य संतोष किटूकले, सुद्दा उपस्थित होते.

चौकट क्रमांक 1
( तालुक्यातील बाजारपेठ आजपासून खुली करण्यात आली असून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण निघूनही बाजारपेठ मध्ये गर्दी बघून कोरोनाची दहशत संपली असल्याचे चित्र निर्माण झाल्याचे दिसत होते.तर अधिक कोरोना विषाणू बाबत नागरिक गंभीर नाही का अशी चर्चा शहरात सुरू आहे.तर ग्रामीण भागातील क्वारटाइन सेंटर वर देखील प्रशासन चा दुर्लक्षित पणा दिसून येत आहे.