टोळधाडी चा चांदुर बाजार तालुक्यातील नागरवाडी परिसरात शिरकाव कृषिविभाग अलर्ट तर कृषी सेवक यांची कसरत

0
1230
Google search engine
Google search engine

टोळधाडी चा चांदुर बाजार तालुक्यातील नागरवाडी परिसरात शिरकाव
कृषिविभाग अलर्ट तर कृषी सेवक यांची कसरत

शशिकांत निचत :- (कृषी विभाग वृत्त)

मध्यप्रदेशातून टोळधाड (Locust) सातपुडा पर्वत मार्गे महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक मोर्शी तालुक्यात दाखल झाला होता.भाजीपाला ,संत्रा चे त्या भागात अतिशय मोठ्या उत्पादकांचे मोठे नुकसान या टोळधाड ने केले.रात्रभरात किती नुकसान करणार यामुळे शेतकरी चिंतेत असताना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या भागात फवारणी केली.

मोर्शी नंतर चांदुर बाजार तालुक्यात या टोळधाड कीटक चा प्रवेश हा नागरवाडी शेर शिवार मध्ये झाला असून त्या ठिकाणी कार्यरत असलेले कृषी सेवक यांनी त्या शेत शिवार मध्ये रात्री 11 च्या दरम्यान पाहणी करून फवारणी केली.मात्र या टोळधाड मुळे चांदुर बाजार कृषी विभाग अलर्ट वर असून कृषी सेवक यांनी ग्रामीण भागात जाऊन जनजागृती सुद्दा केली आहे.तसेच शेतकरी यांनी सुद्दा खबरदारी बाळगण्याचे आव्हान कृषी विभाग मार्फत करण्यात आले.

तसेच शेतकरी यांनी गट तयार करून शेतात पाहणी करावी,डबे पत्रे,किंवा हॉर्न वाजवून आवाज करावा,तसेच कृषी विभाग यांची सल्ला नुसार फवारणी करणयात यावी अशे आव्हान चांदुर बाजार तालुका कृषी विभाग कडून करण्यात आले.

चौकट क्रमांक 1
दमट वातावरण अधिक पोषक……….
टोळधाडी दमट वातावरण अधिक पोषक असल्याने ते त्या भागात त्याच्या पिलांना जन्म देतात आणि त्या ठिकाणी असलेल्या पिकांना अधिक धोका पोहचवता त.तसेच ही टोळधाड निघून गेली की जमीन जणू जळाली असल्यासारखी दिसते.

चौकट क्रमांक 2
मायग्रेशन शक्ती अधिक……
या टोळधाड ची एका ठिकाण वरून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेशन करण्याची शक्ती अधिक असते.ते मोठ्या संख्येने प्रजोउत्पादन करतात.तर एका हल्ल्यात किती तरी धान्य ते नष्ट करतात.यामुळे शेतकरी यांची चिंता अधिक वाढली आहे.