जीवघेणा हल्ला करणारे 12 तासाच्या आत गजाआड शिरजगाव कसबा पोलीस यांची कार्यवाही,एक दिवसाची पोलीस कोठडी

Google search engine
Google search engine

जीवघेणा हल्ला करणारे 12 तासाच्या आत गजाआड
शिरजगाव कसबा पोलीस यांची कार्यवाही,एक दिवसाची पोलीस कोठडी

अमरावती:-

स्थानिक देऊरवाडा येथील रहिवाशी शेख हाशीम शेख आजम याना ईद निमित्ताने कब्रस्तानात फुले वाहण्याकरिता गेला होता तेथून परत येत असताना आरोपी नाव आरोपी। :- 1) शेख मोहसीन 2) शेख कसिफ दो.रा. देऊरवाडा यांनी संगनमत करून जखमी यास शिवीगाळ केली व जखमी यांचे पायावर लोखंडी रॉड व कोयत्याने मारले. व तेथून पळून गेले.

शिरजगाव कसबा चे ठाणेदार गोपाल उपाध्यय यांनी पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला आणि 12 तासाच्या आत आरोपीला अटक केली असून त्याच्या जवळ गुन्ह्यात वापरलेले साहित्य जप्त केले असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मेडिकल अहवाल वरून पोलिसांनी त्या दोघांवर 326,325,294,34 भादवी अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.तसेच पुढील तपास ठाणेदार गोपाल उपाध्यय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉस्टबल भुणेशवर तायडे,आणि पोलीस करीत आहे.