कोदोरी शेतशिवार मध्ये आढळून आले वन्यप्राण्यांचे पगमार्ग वनविभागाने अधिकारी यांनी केली पाहणी

0
1177
Google search engine
Google search engine

कोदोरी शेतशिवार मध्ये आढळून आले वन्यप्राण्यांचे पगमार्ग
वनविभागाने अधिकारी यांनी केली पाहणी

चांदुर बाजार:-शशिकांत निचत

तालुक्यातील मौजे कोदोरी येथील मनोज देशमुख यांच्या शेत शिवार मधील संत्रा फळबाग मध्ये वन्य प्राण्यांचे पगमार्गकरून आढळून आले.मात्र शेतकरी यांनी वनविभागाचे कर्मचारी याना याबाबत माहिती दिली असतात अधिकारी यांनी त्या पगमार्ग ची पाहणी करून हे पगमार्ग तडस किंवा बिबट चे असल्याचे स्पस्ट केले.मात्र प्रत्यक्ष दर्शी नसल्याने नेमका हा प्राणी कोणता याबाबत स्पष्टता होऊ शकली नाही.

सध्या कोरोना च्या परिस्थिती मध्ये ग्रामीण भागातील नागरिक दुपारी च्या वेळेला घराबाहेर जाणे टाळत आहे.अश्यात शेतात वन्य प्राणी यांचा वावर जास्त वाढला असून वनविभागाचे कर्मचारी गस्तीवर आहे.तरी देखील नागरिकांनी सावधगिरी बाळगून कामे करावी असे आव्हान केले जात आहे.

तसेच शेतात जात असताना आपली काळजी घेऊन कामे करावी.तसेच काही माहिती मिळाली असल्यास वनविभाग ला माहिती देण्यात यावी.यावेळी परतवाडा येथील वनविभागाचे अधिकारी विजय तायडे, गोविंद गिरी यांनी ज्या ठिकाणी पगमार्ग आढळून आले त्या ठिकाणी पाहणी केली.चिखलात हे पगमार्ग असल्याने ते बिबट चे की तडस चे याबाबत स्पस्टता देऊ शकले नाही.मात्र नागरिक यांनी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले.