नांदगावच्या दोन युवकांना दुचाकीवरून दारू वाहतुक करतांना पकडले ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
388

ठाणेदार वानखडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय चौधरी यांची कारवाई

चांदूर रेल्वे –

दुचाकीवरून अवैधरित्या देशी व विदेशी दारूची वाहतुक करतांना नांदगाव खंडेश्वरच्या दोन युवकांना चांदूर रेल्वेत पेट्रोलिंग दरम्यान बुधवारी (ता. २७) दुपारी पकडले. सदर कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी यांनी केली.

प्राप्तमाहितीनुसार, बुधवारी दुपारी १.२० ते १.५० च्या दरम्यान पीएसआय राहुल चौधरी व ना.पो.कॉ. सुरेंद्र वाकोडे हे चांदूर रेल्वे शहरात पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना दुचाकीवरून दारू वाहतुक होत असल्याची गुप्त खबर मिळाली होती. या खबरीवरून स्मशानभुमीजवळ होन्डा लिवो क्र. एमएच २७ सीएफ १५६१ ने जात असलेले आरोपी राहूल गौतम गेडाम (२४) व विजय वसंतराव सोनोने (२२) रा. ओंकारखेडा, प्रभाग क्र. ५, नांदगाव खंडेश्वर यांना थांबवून त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याजवळ २३ नग ऑफीसर चॉईस ब्लू प्रत्येकी १८० एम.एल. किंमत ३२२० रूपये व ३५ नग देशी दारू टँगो पंच प्रत्येकी ९० एम.एल. किंमत ९१० रूपये एवढा माल आढळून आला. सदर दारू अवैधरित्या व विनापरवाना मिळून आल्याने दारू व दुचाकी अंदाजे किंमत ५० हजार रूपये असा एकुण ५४ हजार १३० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याविरूध्द कलम ६५ ई प्रमाणे कारवाई करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय राहुल चौधरी व ना.पो.कॉ. सुरेंद्र वाकोडे यांनी केली.