ग्रामीण भागात क्वारटाइन करताना स्थानिक प्रशासन कडून भेदभाव विलीगिकरण ग्रामीण भागात प्रशासन बाबत रोष

ग्रामीण भागात क्वारटाइन करताना स्थानिक प्रशासन कडून भेदभाव

  • विलीगिकरण ग्रामीण भागात प्रशासन बाबत रोष

चांदुर बाजार :- बाा

कोरोना मुळे गावातून बाहेर गावी गेलेल्या नागरिक आपल्या गावी परत येत आहे.तर त्याना कोरोना विषाणू ची लागण आहे की नाही याबाबत माहिती साठी विलीगिकरण केले जात आहे.यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत प्रशासन यांनी जिल्हा परिषद शाळेच्या इमारत मध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.मात्र या विलीगिकरण मध्ये ग्रामीण भागात भेदभाव पाहायला मिळत आहे.त्यामुळे नागरिक यांचा रोष वाढत असताना पाहायला मिळत आहे.

बाहेर गाव वरून गावात आल्यावर विलीगिकरण केले जात आहे.यासाठी आरोग्य कर्मचारी,पोलीस पाटील, कोतवाल ,तलाठी यांची आरोग्य समिती त्या ठिकाणी कार्यरत आहे.मात्र विलीगिकरण करत असताना जे नियम पाळायला पाहिजे ते पाळले जात नाही आहे.तर कुटूंब मधील नातेवाईक विलीगिकरण करण्यात आलेल्या व्यक्ती च्या थेट संपर्क मध्ये येत असल्याने आणि गावात त्यांच्या मुक्त संचार सुरू आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी ग्रामीण भागात कोरोना ला कोणिभीत नसल्याचे नागरिक दाखवीत आहे.

विलीगिकरण करताना राजकीय तसेच ओळखीचा अधिक जास्त फायदा हा ग्रामीण भागात घेतला जात आहे.त्यामुळे अनेक ग्रामीण भागात कर्मचारी यांच्या सोबत त्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे.यासाठी प्रशासन यांनी सर्वच साठी नियम सारखे ठेवण्यात यावे.अशी नागरिक यांची मागणी वाढत आहे.तर इतर प्रमाणे ज्यांना होमक्वारंटाइन करणे शक्य आहे ते सर्वांसाठी मान्य का नाही अशा प्रश्न आता ग्रामीण भागात विलीगिकरण च्या भेदभाव वरून दिसून येत आहे.

चौकट क्रमांक 1…………..
माहिती जात आहे लपविल्या.
बाहेर गावातून गावात आल्यावर माहिती देण्याचे किंवा तपासणी करण्याचे अनेक जण टाळत आहे.त्यामुळे प्रशासन बरोबर गावात सुद्धा एक प्रकारच्या भीती चे वातावरण तयार होते आहे.तसेच नेमका ज्या ठिकाणी वरून आले आहे त्याबद्दल ची सत्यता पण उघड पणे सांगितले जात नाही आहे.