आपसी वादातुन आकोट शहरात एकाची हत्या

0
548
Google search engine
Google search engine

अकोटःता.प्रतिनीधी

अकोट शहरातील धारुळी वेस भागात क्षुल्लक वादाच्या पार्श्वभुमीतुन दोघांमध्ये वाद झाला.या वादात माझ्याकडे डोळे वटारुन का बघतो’ अशा क्षुल्लक कारणावरुन एकाने दुसऱ्याची चाकूचे सपासप वार करुन हत्या केली. सदर घटना 28 मे रोजी रात्री घडली.शहरातील धारुळीवेस भागात घडलेल्या या घटनेनेमुळं खळबळ उडाली असुन मृतकाच्या
काकाने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध कलम 302 नुसार शहर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रानुसार रमजान महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृतक मुदासिर अली मुख्तार अली याचा लहान भाऊ व आरोपी यांच्यात भांडण झाले होते.त्यानंतर 28 मे रोजी रात्री धारूळीवेस या ठीकाणी पुन्हा दोघामधे भांडण झाले ‘तु माझ्याकडे डोळे वटारुन का बघतो’असे म्हणत आरोपीने आपल्या हातातील चाकूने मुदासिर अली याच्या छातीच्या डाव्या बाजुला सपासप वार केले.या हल्यात मुदासिर अली गंभीर जखमी होऊन खाली पडला त्याला प्रथम अकोट ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.तेथून त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.या घटनेची फिर्याद अकोट शहर पोलिस स्टेशन येथे मोबिन अली जामीन अली यांनी दाखल केली.पोलिसांनी धारुळीवेस येथीलच आरोपी विरुध्द भांदवि 302 कलमन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढिल तपास आकोट शहर पोलिस आहे.