काय आहे श्री गजानन भक्तांची इच्छा !

0
464
Google search engine
Google search engine

 

शेगांव :- जगात वैस्विक महामारीचे अर्थातच कोविड-१९ म्हणजेच कॉरोना व्हायरस चे संकट आपले आक्रळ विक्राळ रूप हळू हळू धारण करीत आहे. प्रत्येक देश प्रत्येक व्यक्ती आपला बचावाचा पवित्रा आपल्या हाती घेऊन ताक फुंकून पित असल्यासारखे वागत आहे.

कोरोना मुळे सर्वत्र लॉक डाऊन ची परिस्थिती ओढवली असताना शाळा, कॉलेज, सिनेमा हॉल, पर्यटनाची ठिकाणे येवढेच नाही तर ज्यां गोष्टींमुळे देशाची ओळख, अभिमान आहे असे देशातील अनेक जगप्रसिद्ध मंदिरे या व्हायरसचा संसर्ग होऊ नाही म्हणून बंद ठेवण्याचे आदेश शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत देण्यात आले. त्यातीलच एक जगप्रसिद्ध मंदिर म्हणजे विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेले अनेक भाविकांची श्रद्धा स्थान असलेले शेगावातील श्री संत गजानन महाराज मंदिर हे सुध्दा गेल्या ३ महिन्यांपासून भक्तांसाठी बंद आहे.

साध्य स्थितीमध्ये महाराजांचे मंदिर बंद असल्याकारणाने अनेक भक्त महाराजांच्या मंदिरासमोर येऊन, ज्यांना देवळा समोर जाता येत नाही ते भक्त आपल्या डोळ्यांमध्ये महाराजांची समाधिस्त असलेली मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणुन, आपण आहोत त्या जागी घरी, दारी, आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्या आराध्य देवतेला श्री गजाननाला हे कोरोना विषाणू चे संकट दूर सरण्यासाठी त्याचे निवारण करण्यासाठी प्रार्थना करतो आहे, अविरत ‘गण गण गणात बोते’ भजनाचा गजर करत या विषाणु चा नायनाट कर आणि आम्हाला तुझे दरवाजे उघड पूर्ववत् तुझे दर्शन घडू दे असे मागणे सुध्दा मागतो आहे.

शहरात तसेच शहराभवतीच्या परिसरातील गावांत श्रींचे अनेक भक्त आपल्या पूज्य देवतेच्या दर्शना वाचुन या लॉक डाऊन मूळे वंचित झाले आहे. आपल्या देवाची मूर्ती आपल्या डोळ्यांमध्ये साठवण्यासाठी, आपल्या देवाची मनोभावे सेवा करण्यासाठी, त्यांच्या वारीचा आनंद अनुभवण्यासाठी असंख्य श्री गजानन भक्त लॉक डाऊन सुटण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.मंदिरात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत १०० भक्तांना ऑनलाईन बुकींग द्वारे प्रवेश देण्यावर शासनाने व संस्थांनने पाऊल उचलावे अशी चर्चा अनेक भक्तांमध्ये होतांना दिसत आहे.