कडेगाव शहरातील एकाच नगरसेवकांनी जोपासली सामाजिक बांधिलकी. प्रभात १७ चे नगरसेवक यांनी स्वखर्चाने वाटल्या आर्सेनिक अल्बम ३० ग़ोळया वाटल्या.

Google search engine
Google search engine

कडेगावःप्रतिनिधी.
कडेगाव नगरपंचायतीचे प्रभाग १७ मधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक नितीन आनंदराव शिंदे यांनी स्वखर्चाने प्रभागातील जवळपास 300 कुटुंबातील घरोघरी जाऊन सर्व व्यक्तींना आर्सेनिक अल्बम 30 या कोरोना (कोविड 19 ) या विषाणूजन्य आजारास प्रतिबंधात्मक म्हणून व व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या औषधाचे मोफत वाटप केले. या अगोदरही कोरोनाच्या प्राथमिक अवस्थेत असताना त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देवून कडेगाव शहरातील पाच गरिब कुटुंबातील लोकांना संसार उपयोगी किटचे वाटप करण्यात आले होते
कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्याला कारणही तसेच आहे. कोरोना व्हायरस
वेगात पसरणारा संसर्गजन्य रोग आहे. संसर्ग झाल्यास सध्या तरी कोरोनाव्हायरवर कोणताही ठोस उपाय नाही. कोरोनाव्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणतीही प्रतिबंधात्मक लस सध्या तरी उपलब्ध नाही. याचा अर्थ
इतकाच आहे की प्रत्येकाने स्वतः तयार राहायचे आहे.या त्यांच्या उपक्रमाचे भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख (बाबा) मा.जि.प.अध्यक्ष संग्राससिंह देशमुख यांनी कौतुक केले.
कोरोनाव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी. कोरोनाव्हायरसचा तुम्हाला मुकाबला करायचा असेल तर तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे गरजेचे आहे .
देश आणि राज्यावर हे कोरोना रुपी विषाणूजन्य आजाराचे जे संकट आले आहे त्याचा आपण सावध व योग्य ती काळजी घेऊन मुकाबला करणे गरजेचे आहे.
डॉक्टर, प्रशासन, पोलीस खाते, पत्रकार आपआपल्या परीने जनजागृती करून या आजारापासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारचे उपाययोजना करीत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज प्रभागात या औषधाचे वाटप केले. समाजऋण म्हणून आपले कर्तव्य बजावणे आपणा सर्वांना बंधनकारक आहे .
उपक्रम राबविण्यात शंभूराजे नवरात्र उत्सव मंडळ वडतुकाई नगर व ओम साई गणेश व नवरात्र उत्सव मंडळ गोविंदगिरी नगर या मंडळातील सदस्य राहुल गायकवाड, तुषार रेणुशे, संदीप पवार, अमोल पवार, जगन्नाथ मोहिते, दीपक कुंभार, शुभम चव्हाण, सागर सुतार, संतोष भावके, प्रतीक पाटील , अमोल पवार , अभिजित पाटील, सिध्दनाथ शिंदे, महेश भोसले आदी सदस्य व नेवरी प्रा आ केंद्राचे वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.