परतवाड्याची ६० वर्षीय महिला पॉजिटिव्ह नागपुरला उपचार सुरू

0
503
Google search engine
Google search engine

 

परतवाडा अचलपूर येथील एका ६० वर्षीय महिलेला सतत ताप आल्याने नागपूर येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांना नागपूर येथील कोविड रुग्णालयात रेफर करण्यात आले व swab घेण्यात आला. त्यांचा अहवाल positive आला आहे.

दरम्यान, त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध, प्रतिबंधित क्षेत्र प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी दिली.
०००