अखेर सेतू , महा ई सेवा केंद्र सुरू जिल्हाधिकारी यांचे आदेश : सांगली जिल्हा परिषदेची माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या मागणीला यश

Google search engine
Google search engine

सांगली/कडेगाव

कोरोनामुळे शासनाने सर्वत्र लाॅकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्व एकात्मिक नागरी सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्रे बंद होती. परिणामी पुढील काही दिवसात सुरू होणाऱ्या शैक्षणिक कामांसाठी लागणारे दाखले विद्यर्थांना मिळत नाहीत, ते मिळण्यासाठी तत्काळ सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केली होती, अखेर या मागणीला यश आले असून जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी जिल्ह्यातील सर्व एकात्मिक नागरी सुविधा केंद्र, महा ई सेवा केंद्रे सुरू करण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत.
एकात्मिक नागरी सुविधा केंद्र सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन संग्रामसिंह देशमुख यांनी १ जून रोजी कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांना दिले होते .
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशात कोविड -१९ विषाणुची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. त्यामुळे गेले दोन ते अडीच महिने झाले देशात लाॅकडाऊन सुरू केला आहे. तर काही प्रमाणात लाॅकडाऊन शिथिल करण्यात येत आहे. मात्र ज्या भागात कोरोना बाधित रूग्ण सापडतात. त्याठिकाणी कंटेनमेट झोनची अंमल बजावणी केली जात आहे. काही दिवसात शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. लवकरच दहावी – बारावी परीक्षेच्या निकालानंतर पुढिल शैक्षणिक वर्षांत प्रवेश घेण्याची कार्यवाही सुरू होणार आहे. शैक्षणिक प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना उत्पन्न दाखला, डोमासिएल, जातीचा दाखला, नाॅनकिमीलिअर, तीस टक्के महिला आरक्षण, अल्पभूधारक दाखला यांसह विविध दाखल्याची आवश्यकता भासते यासाठीची मागणी जिल्हाधिकारी यांनी मान्य केली आहे.
सेतू केंद्र आता सुरू केली आहेत दाखले काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ करु नये , सेतू केंद्रात गर्दी करु नये, सोशलडिस्टन्सिंगचे पालन करावे विद्यार्थी आणि पालकांना दाखले काढण्यासाठी त्रास होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी असे त्यांनीही सांगीतले आहे.